AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले; राजकीय आक्रोश करणाऱ्यांना 9 सवाल

'द काश्मीर फाईल्स' या सिनेमावरून सुरू असलेला वादाचा धुरळा अजूनही बसलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काश्मीर पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले; राजकीय आक्रोश करणाऱ्यांना 9 सवाल
370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 20, 2022 | 9:17 AM
Share

मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ (the kashmir files) या सिनेमावरून सुरू असलेला वादाचा धुरळा अजूनही बसलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा काश्मीर पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी हिमतीने काश्मिरातील 370 कलम रद्द केले. काश्मिरातून लेह-लडाख वेगळे केले व काश्मीरला सरळ केंद्रशासित राज्य बनवले. काश्मिरातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम संपले आहे. या पद्धतीने जम्मू प्रांतातील विधानसभेच्या जागा वाढतील व त्या प्रांताचा मुख्यमंत्रीसुद्धा एखादा हिंदू होईल. हे चित्र चांगले आहे, पण नव्वदच्या दशकात परागंदा झालेल्या काश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ हा मोदी सरकारचा (modi government) मोठा कार्यक्रम होता. 370 कलम काढल्यावरही पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. हे कोणाचे अपयश आहे?, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. तसेच काश्मिरी पंडितांवरील अन्यायावरून आक्रोश करणाऱ्यांना राऊत यांनी थेट 9 सवाल केले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून हा सवाल केला आहे. ‘द कश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत, पण अशा चित्रपटांचा सध्याचा अजेंडा हा राजकीय विरोधकांबाबत द्वेष आणि भ्रम फैलावणे असाच झाला आहे. याच चित्रपटाच्या निर्मात्याने ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट बनवला होता. तोदेखील एका विशिष्ट गटाचाच अजेंडा ठरला. लाल बहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूला फक्त गांधी परिवार जबाबदार असल्याचा ‘प्रपोगंडा’ या चित्रपटातून करण्यात आला. चित्रपट निर्मितीमागचा जणू तोच एकमेव हेतू होता. देशाचा इतिहास फक्त पुस्तकांतूनच बदलला जात नाही, तर आता चित्रपटांसारख्या माध्यमांतूनही तो बदलण्याचा प्रयत्न होतोय, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

तेव्हा ‘काश्मीर फाईल’ थंड बासनात पडून होती

काश्मीरचा माहोल 32 वर्षांपूर्वी फक्त काश्मिरी पंडितांसाठीच खराब नव्हता, तर सगळ्यांसाठीच खराब होता आणि काश्मिरी पंडित त्यात सगळ्यात जास्त भरडून निघाले. त्या वातावरणात पंडितांबरोबरच काश्मिरी शीख, मुसलमानांच्याही हत्या झाल्या. काश्मिरात पहिली राजकीय हत्या नॅशनल कॉन्फरन्सचा नेता मोहम्मद युसूफ हलवाईची यांची ऑगस्ट 1989 मध्ये झाली. त्या आधी प्रशासकीय अधिकाऱ्यावर जो पहिला हल्ला झाला होता तो पोलीस महानिरीक्षक जी. एम. बटालीवर. त्यात बटालीचा अंगरक्षक ठार झाला. त्यानंतर थोड्याच दिवसांत बटालीचे लहान भाऊ गुलशन बटालींची हत्या करण्यात आली. अशा अनेक गोष्टींचे सत्य ‘द कश्मीर फाईल्स’मधून लपविले गेले आहे. 1947 नंतर 43 वर्षे कश्मिरी पंडितांवर पळून जाण्याची नौबत कधीच आली नव्हती. 1990 साली 4 लाख हिंदू-शिखांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले. तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंगांचे सरकार होते. भाजपचे नेते जगमोहन हे कश्मीरचे राज्यपाल होते. खोऱ्यांत हिंदू मरत होते, पळत होते तेव्हा ‘काश्मीर फाईल’ थंड बासनात पडून होती, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

राऊतांचे 9 सवाल

  1. काश्मिरी पंडितांचे पलायन व त्यांच्या हत्या यादरम्यान दिल्लीत व कश्मीरात कुणाची राजवट होती?
  2. काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले व हत्या झाल्या. नव्वदच्या दशकांत 24 हजार पंडितांचे पलायन काश्मीर खोऱ्यातून झाले. त्याच काळात शीख व मुसलमानदेखील मारले गेले. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हजारो शीख व मुसलमानांचे शिरकाण केले. सुरक्षा दलांतील असंख्य मुसलमान जवानांची हत्या करण्यात आली.
  3. काश्मीरातील अतिरेकी संघटनांशी सरळ हातमिळवणी करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व त्यांच्या पक्षाशी युती करून भाजपने जम्मू-काश्मिरात सरकार कसे स्थापन केले? पंडितांच्या पलायनाचा व हत्येचा तेव्हा साधा निषेधही या लोकांनी केला नव्हता. ‘पीडीपी’ने अफझल गुरूला स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा दिला व अतिरेकी बुरहान वानीला लष्कराने खतम करताच मुख्यमंत्री मेहबुबाने लष्कराच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. तेव्हा सरकारात असलेले भाजपचे मंत्री हा सर्व प्रकार थंडपणे का सहन करीत होते?
  4. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तुमच्या घोषणेचे काय झाले?
  5. नव्वदच्या दशकात पाक अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही म्हणून धमक्या देताच यात्रेसाठी पोहोचलेल्या हिंदूंमध्ये दहशत पसरली. काश्मीर खोऱ्यातील अमरनाथ यात्रेसाठी जमलेल्या गुजरातच्या श्रद्धाळूंनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साकडे घातले. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी अमरनाथ यात्रा उधळण्याचे कारस्थान रचणाऱ्या पाक अतिरेक्यांना सरळ शिंगावरच घेतले. अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या एका जरी हिंदूंच्या केसाला धक्का लागला तरी मुंबईतून काय, तर देशातून हजला जाणारे एकही विमान उडू देणार नाही, असे ठणकावताच अतिरेकी थंड झाले. त्या काळात भाजपच्या एकाही नेत्याने पाठिंब्यासाठी तोंड का उघडले नाही?
  6. निर्वासित काश्मिरी पंडितांच्या मुलांचे शिक्षण रखडू नये, त्यांना समाजात उभे राहता यावे म्हणून शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात पाच टक्के जागा राखीव ठेवल्या. काश्मिरी पंडितांसाठी असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य होते. भाजपशासित इतर राज्यांनी हा असा निर्णय कधीच का घेतला नाही?
  7. 2019 च्या निवडणुकीच्या आधी काश्मीर खोऱ्यात झालेला ‘पुलवामा’ हल्ला. 40 जवानांना त्यात वीरमरण आले. हे चाळीस जवान ‘पंडित’ नसतीलही, पण एकाच वेळी इतक्या जवानांना वीरमरण कोणाच्या चुकीमुळे आले? उरी, पठाणकोट ते पुलवामा अशा हल्ल्यांनी काश्मीर घटनांची फाईल आपल्याच रक्ताने माखली नाही काय?
  8. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न! काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? की त्यांचा आक्रोश, त्यांचे पलायन, त्यांचा रक्तपात यावर राजकारणच होत राहणार.
  9. ‘द काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ हा पुढच्या निवडणुकांचा अजेंडा आहे. कश्मीरातील सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला, असे पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत सांगितले व ‘द काश्मीर फाईल्स’ची प्रशंसा केली. काश्मिरी पंडितांचे पलायन, त्यांचा नरसंहार हे सत्य कधीच कोणी लपवले नाही. देशभरातील निर्वासित छावण्यांत, आपल्याच देशात, आपल्याच हिंदू पंडितांना जीवन कंठावे लागले हे उघड सत्य तेव्हा होते, आजही आहे. त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे आणि आधार देण्याचे काम तेव्हा फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले. ‘द काश्मीर फाईल्स’चे हे दडपलेले सत्य आहे!

संबंधित बातम्या:

शिवसेनेची मोर्चेबांधणी, CM Uddhav Thackeray खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी आज संवाद साधणार

ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले, त्यांनाच Uddhav Thackeray वाचवत आहेत; श्वेता महालेंचं खळबळजनक विधान

Crime : ‘लिव्ह इन’चा धक्कादायक अंत, उल्हासनगरातील महिलेची हत्या करणाऱ्याला बेड्या, लिव्ह इन जोडीदाराने केली होती महिलेची हत्या

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......