Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यावर मिंधे कुठे जातील ? उद्धव ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल

' काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिध्यांना टॉर्च मारावी लागते' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यानंतर मिंधे कुठे जातील कळत नाही, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल, कळणारही नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.

दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यावर मिंधे कुठे जातील ? उद्धव ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 8:09 AM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. ‘ काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिध्यांना टॉर्च मारावी लागते’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यानंतर मिंधे कुठे जातील कळत नाही, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल, कळणारही नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला.

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगत असून ठाकरे गटाचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तिकडे फक्त संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेच उरतील असे म्हणत शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही काल ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं होतं. तर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. वाघाचं कातडं कोणी पांघरलं तर तो वाघ होत नाही. त्यासाठी त्याच्याकडे वाघाचं काळीज असायला हवं. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले होते. आज देखील माझे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. हे फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं होतं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मात्र यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ” अरे काजवा जरी एवढासा असला तरी तो स्वयंप्रकाशित असतो. पण ह्यांच्यावर ( शिंदे गट) जोपर्यंत तिकडून टॉर्च मारला जातोय तोपर्यंत दिसंतय. दिल्लीतून टॉर्च बंद झाला की अंधारात कुठे जातील कळत नाही. मग त्यांच्याबरोबर जे गेले आहेत, तिथे काळोखात काय चेंगराचेंगरी होईल काहीच कळणार नाही. यांचं भवितव्य फार बिकट आहे ” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.

‘जर तुम्ही खऱी मर्दांची औलाद असाल तर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि पोलिसांना बाजुला ठेऊन आमच्यासोबत लढा’ आम्ही तुम्हाला दाखवून देऊ खरी शिवेसना कोणाची आहे ते’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.