AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महापालिकेपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र त्याचपूर्वी आता शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! महापालिकेपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 6:26 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या स्थरावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार? की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत अजून कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाही, किंवा महायुती आणि महाविकास आघाडीकडून तशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

मात्र या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा पक्षांतरणाला देखील वेग आला आहे.  महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा देखील समावेश आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते महायुतीमध्ये प्रवेश करत असतानाच आता महायुतीमधल्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.

शिवसेना शिंदे गटाला  मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, आणि मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजेखान जमादार यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील  यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडले आहेत.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले होते, त्यातच महायुतीच्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा