AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी, महिला मतदारांसाठी खास रणनिती

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत महिला मतदारांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले होते. ही आकडेवारी पाहता शिवसेनेने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. महिला आघाडीद्वारे महामंगळागौर स्पर्धांसारखे विविध उपक्रम राबवून शिवसेनेकडून महिलांना राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम केले जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी, महिला मतदारांसाठी खास रणनिती
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज
| Updated on: Oct 07, 2025 | 2:20 PM
Share

वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केले होते. मुंबईतील 24 विधानसभा मतदार संघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त होता. ही आकडेवारी पाहता शिवसेनेने महिला मतदारांसाठी खास रणनिती तयार केली आहे. पालिका निवडणुकीत महिलांचे मतदान वाढावे, यासाठी महिला आघाडीकडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. लाडक्या बहिणींमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करणारी शिवसेनेची महामंगळागौर स्पर्धा नुकताच मुंबईत पार पडली. यात तब्बल 6 हजार महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी भारती विद्या भवन येथे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

राज्यात लाडकी बहिण योजनेला यश मिळाल्यानंतर शिवसेनेकडून महिला वर्गासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना लागू केली होती. या योजनेच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाचा टक्का वाढला. या वाढीव मतदानाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. महायुतीचे एकूण 235 आमदार निवडून आले. यात शिवसेनेचे 60 आमदार होते. विधानसभा निवडणुकीत मुंबईत एकूण 55.46 टक्के मतदान झाले होते. यात महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. मुंबईतील 55.92 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर 55.07 टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले होते. मुंबईतील 24 विधानसभा मतदार संघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त होता.

महिला मतदार मुंबई महापालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू

त्यामुळे यंदा महिला मतदार मुंबई महापालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू असतील. महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करत शिवसेनेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला आघाडी ही शिवसेना पक्षाची अविभाज्य घटक आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकियरित्या सक्षम करण्याचे काम पक्षाकडून केले जात असल्याचे शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या. आगामी निवडणुकीसाठी महिला आघाडी सज्ज आहे. महिला आघाडी ही शिवसेनेची ताकद असून महिलांच्या मनात आले तर त्या काय चमत्कार करु शकतात, हे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. आता येत्या महापालिका निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी विरोधकांना जोडे दाखवतील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.

महामंगळागौर स्पर्धेत मागाठाणे येथील कलादर्पण गटाने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक भायखळा येथील शिवकन्या आणि तृतीय क्रमांक चेंबूर येथील चंद्रकोर गटाने पटकावला. “उत्सव मुंबईचा” सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हनुमान सेवा मंडळाने पहिला क्रमांक पटकावला. निकदवरी लेन सार्वजनिक मंडळ (गिरगावचा राजा) आणि ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्दीचा राजा) यांना संयुक्तरित्या दुसरा क्रमांकाने गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक भांडुप येथील कोकण मित्र मंडळ आणि शिवाजी पार्क (हाऊस) यांना संयुक्तरित्या देण्यात आला. स्पर्धांचे आयोजन शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. “उत्सव मुंबईचा” स्पर्धेत मुंबईतील ४५० गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. यात ५० गणेश मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.