Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Minister Sanjay Rathod Pohradevi LIVE : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी ते समोर आले. 

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया
संजय राठोड

यवतमाळ/ वाशिम : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan)  मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं संजय राठोड म्हणाले. (Shivsena leader Sanjay Rathod Visit Pohradevi Temple Live Updates)

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले.  (Shivsena leader Sanjay Rathod Visit Pohradevi Temple Live Updates) या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 Feb 2021 15:30 PM (IST)

  Pooja Chavan case : पूजा चव्हाण प्रकरणात संपूर्ण शिवसेना चिडीचूप : आशिष शेलार

  बाळासाहेबांची शिवसेना माता भगिनींचं रक्षण हे प्रथम कर्तव्य असं मानणारी होती . मात्र पूजा चव्हाण प्रकरणात संपूर्ण शिवसेना चिडीचूप आहे, संजय राठोड प्रकरणात गुन्ह्यापासून वाचण्यासाठी समाजाची ढाल पुढे केली जातेय, आजपर्यंत अदृष्य असणारे संजय राठोड आज दिसले तसं अदृष्य चौकशी आता समोर करणार का ? आशिष शेलार यांचा हल्लाबोल

 • 23 Feb 2021 15:28 PM (IST)

  संजय राठोड जे म्हणाले, तेच आम्ही सांगत होतो : नाना पटोले

  संजय राठोड यांनी जी भूमिका मांडली तीच आम्ही सांगतोय, पोलीस तपास करत आहे, तो तपास योग्य पद्धतीनं होईल, मीडिया ट्रायलची गरज‌ नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली

 • 23 Feb 2021 14:18 PM (IST)

  संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता, चित्रा वाघ यांचा सवाल

  निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड यांनी केला. संजय राठोड त्यांनी केलेल्या पापाची कबुली करण्यासाठी ते बंजारा समाजाच्या काशीमध्ये गेले. समाजाला एकत्रित करुन घोषणाबाजी केली गेली. दोन फरार मुलांपैकी एका मुलाचा सुगावा लागला. संजय राठोडांचा शहाणपणा गेले पंधरा दिवस कुठे होता. दोन पैकी एक मुलगा फरार आहे. एक मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्या मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळा, असं आव्हान चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला दिले.

  राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली. पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेला अहवाल ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे. बंजारा समाजाबद्दल आदर आहे. आपण शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं, हे योग्य नाही. संजय राठोड हा पूजा चव्हाणांचा हत्यारा आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

  राजकारणासाठी समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेंड राजकारणात येत आहे.

 • 23 Feb 2021 14:08 PM (IST)

  संजय राठोडांचं प्रसारमाध्यमांसमोर येण्याचं नाटक: प्रविण दरेकर

  संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येण्याचं नाटक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक दबावाला बळी पडू नये, असं आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

 • 23 Feb 2021 13:53 PM (IST)

  पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

  पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचं बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. तिच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण केले जातेय.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या प्रकरणावरुन गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदनामी करु नका, असं आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.

  मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता मी मागासवर्गीय, ओबीसीचं नेतृत्व करणारा नेता आहे. माझ्या राजकीय जीवनाला उद्धवस्त करण्यासाठीचं षडयंत्र गेले. या कुठल्याच गोष्टीत तथ्य नाही.

  सर्वांना विनंती की माझी, कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी करु नका. माझी पत्नी आहे, आई वडील आहे, मुलं बाळं आहेत, त्यांना सावरत होतो. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास, मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा.

  सोशल मीडियावर फोटो आपण सर्वजण पाहता. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली 30वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये  उभं करु नका, असं संजय राठोड म्हणाले. मी विश्वासाने सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. गेल्या दहा दिवसापासून अतिशय घाणेरडं राजकारण केले गेले. माझं काम मुंबईतील फ्लॅट  सुरु होतं, असं संजय राठोड म्हणाले. अरुण राठोडवर बोलण्यास संजय राठोड यांनी नकार दिला.

 • 23 Feb 2021 13:20 PM (IST)

  संजय राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

  संजय राठोडांच्या समर्थकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. राठोडांचे हजारो समर्थक मंदिर परिसरात दाखल जाले आहेत. पोलिसांना न जुमानता समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. जिल्हा प्रशासनानं फक्त 50 जणांना हजर राहण्याची परवानगी दिली होती.

 • 23 Feb 2021 13:15 PM (IST)

  संजय राठोड रामराव महाराजांच्या समाधीस्थळी दाखल

  वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावरील संत सेवालाल महाराज मंदिरात दर्शन घेतले आहे. यानंतर ते रामराव महाराजांच्या समाधीस्थळी दाखल झाले आहेत.  राठोड समर्थकांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आहे.संजय राठोड होम हवन कडे पोहोचत आहेत,आज सकाळपासून सुरू आहे हवन, माता जगदंबा मंदिरात संजय राठोड दखल हवन परिसरातही हजारो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे.

 • 23 Feb 2021 13:13 PM (IST)

  संजय राठोड यांच्याकडून संत सेवालाल महारज मंदिरात दर्शन

  वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावरील संत सेवालाल महाराज मंदिरात दर्शन घेतले आहे. यावेळी संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले आहेत. राठोड समर्थकांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आहे.संजय राठोड होम हवन कडे पोहोचत आहेत,आज सकाळपासून सुरू आहे हवन, माता जगदंबा मंदिरात संजय राठोड दखल हवन परिसरातही हजारो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे.

 • 23 Feb 2021 13:08 PM (IST)

  संजय राठोडांच्या शक्ती प्रदर्शनावर भाजप नेते आक्रमक, महाविकास आघाडीनं शक्ती कायद्याची टिमकी न वाजवण्याचं आवाहन

 • 23 Feb 2021 13:06 PM (IST)

  संजय राठोड बाबुसिंग महाराज समाधीस्थळाच्या दर्शनानंतर बाहेर

  संजय राठोड पोहरादेवी गडावरील बाबुसिंग महाराज समाधीस्थळाच्या दर्शनानंतर बाहेर पडले आहेत. संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे. तर, जिल्हा प्रशासनानं आदेश देऊनही राठोड समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

 • 23 Feb 2021 13:00 PM (IST)

  संजय राठोड यांच्याकडून बाबुसिंग महाराज समाधीचं दर्शन

  वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावरील बाबुसिंग महाराज समाधीचं दर्शन घेतले आहे. संजय राठोड यांच्यासोबत पोहरादेवी गडावर शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर, संजय राठोडांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत.

 • 23 Feb 2021 12:58 PM (IST)

  पोहरादेवी गडावरील शक्तीप्रदर्शनावर कारवाई करा, प्रविण दरेकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  पोहरादेवी येथे करोनाची कोणतीही काळजी न घेता शक्तिप्रदर्शन सुरू आहे, मुख्यमंत्रांच्या आदेशाचे सरळ उल्लंघन केले जाते आहे, जिल्हा प्रशासन म्हणून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

 • 23 Feb 2021 12:52 PM (IST)

  संजय राठोड यांनी सपत्निक जगदंबा मंदिरात दर्शन घेतले

  वनमंत्री संजय राठोड यांनी सपत्निक जगदंबा मंदिरात दर्शन घेतले आहे. जगदंबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड बाहेर पडले आहेत. यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

 • 23 Feb 2021 12:49 PM (IST)

  संजय राठोड समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज,गर्दी वाढल्यानं पोलीस अ‌ॅक्शन मोडवर

  पोहरादेवी गडावर वर्दळ वाढली, मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने लोकांचा ओघ सुरू, संजय राठोड यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिक मंदिर प्रवेशद्वारावर दाखल झाले आहेत. समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज गर्दी वाढल्याने पोलीस ऍक्शन मोडवर आहेत.

 • 23 Feb 2021 12:47 PM (IST)

  बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या धर्मपीठ येथून संजय राठोड माध्यमांशी बोलणार

  संजय राठोड पोहरादेवी इथल्या चार पिठातील दर्शन झाल्यानंतर बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या धर्मपीठ इथून मीडिया ला बोलणार आहेत. पोहरादेवी गडावर वर्दळ वाढली, मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने लोकांचा ओघ सुरू, संजय राठोड यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिक मंदिर प्रवेशद्वारावर दाखल

 • 23 Feb 2021 12:40 PM (IST)

  संजय राठोड पत्नीसह पोहरादेवी गडावर पोहोचले, समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित

  वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल झाले आहेत. पोहरादेवी येथे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. कार्यककरत्यांकडून संजय राठोडांच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात येत आहेत. पोहरादेवी गडावर संजय राठोडांचे समर्थकांनी मोठी गर्दी केली असून राठोंडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत आहे. राठोड गाडीतून उतरुन पायी चालत गडावर दाखल झाले आहेत.

 • 23 Feb 2021 12:39 PM (IST)

  संजय राठोडांचे समर्थक पोहरादेवीच्या दिशेने पायी रवाना

  वायगोळ मधून मोठ्या प्रमाणात संजय राठोडांचे समर्थक पोहरादेवीच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत.  पोलिसांनी गाड्या अडवल्यानंतर समर्थक पायी निघाले.

 • 23 Feb 2021 12:35 PM (IST)

  संजय राठोड कुठल्याही क्षणी पोहरागडावर पोहोचणार

  संजय राठोड कुठल्याही क्षणी पोहरागडावर पोहोचणार आहेत. समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

 • 23 Feb 2021 12:16 PM (IST)

  संजय राठोड दिग्रस गेस्ट हाऊसवर थांबले, दहा मिनिटात पोहरादेवीकडे रवाना ताफ्यातील गाड्या आणखी वाढल्या

  संजय राठोड दिग्रसमध्ये पोहोचले, दिग्रसमधील शासकीय गेस्ट हाऊसवर राठोड थांबले, काही मिनिटांची विश्रांती घेऊन संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना, दहा ते १५ मिनिटात संजय राठोड दर्शनासाठी निघाले, राठोडांच्या ताफ्यात जवळपास 20 गाड्या

 • 23 Feb 2021 12:08 PM (IST)

  रस्त्यात फटाके वाजवून संजय राठोड यांचं स्वागत

  रस्त्यात फटाके वाजवून संजय राठोड यांचं स्वागत, संजय राठोड यांच्या ताफ्यात 20 गाड्या होत्या, त्यामध्ये पोहरागडाजवळ वाढ होत आहे. संजय राठोड सकाळी 10.50 वाजता यवतमाळवरुन वाशिममधील पोहरादेवीकडे रवाना झाले. यवतमाळ ते पोहरादेवी हे अंतर साधारण 80 किमी आहे.

 • 23 Feb 2021 12:07 PM (IST)

  संजय राठोड समर्थकांकडून फटाके वाजवून स्वागत

  संजय राठोड यांचे समर्थकांकडून फटाके वाजवून स्वागत केले जातं आहे.

 • 23 Feb 2021 11:50 AM (IST)

  “पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी सत्य बोलावं, समाजाची दिशाभूल करु नये”

  बीड: पोहरादेवी गडावर संजय राठोड यांनी सत्य बोलावं, चुकीचं बोलून समाजाची दिशाभूल करू नये, त्यांनी त्यांच्या कृत्याची कबुली द्यायला हवी, पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांची प्रतिक्रिया, 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी, शांताबाई राठोड यांनी पोलिसांकडे केली मागणी

 • 23 Feb 2021 11:29 AM (IST)

  संजय राठोड यांच्या ताफ्यात किती वाहने?

  संजय राठोड यांच्या ताफ्यात 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहनं, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे. संजय राठोड हे यवतमाळमधून आर्णीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांची आणखी एक गाडी त्यांच्या ताफ्यात दाखल झाली.

 • 23 Feb 2021 11:12 AM (IST)

  संजय राठोड घरातून बाहेर पडले तो क्षण

  संजय राठोड घरातून बाहेर पडले तो क्षण, संजय राठोड सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना, यवतमाळमधील घरातून वाशिममधील पोहरादेवीकडे रवाना

 • 23 Feb 2021 11:02 AM (IST)

  संजय राठोड सपत्नीक पोहरादेवी मंदिराकडे रवाना

  मंत्री संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे आज पहिल्यांदा दिसले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. संजय राठोड सपत्नीक पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले

  सविस्तर बातमी :

  संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीकडे रवाना; शिवसेना नेतेही सोबत

   

 • 23 Feb 2021 10:40 AM (IST)

  Sanjay Rathod : संजय राठोड थोड्याच वेळात पोहरादेवीच्या दर्शनाला निघणार

  संजय राठोड यांच्या यवतमाळमधील घरासमोर पोलिसांचा एस्कोर्ट दाखल, राठोड यांच्या घरी स्थानिक नेते येण्यास सुरुवात, राठोड यांच्या घरात पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती, संजय राठोड थोड्याच वेळात पोहरादेवीच्या दर्शनाला निघणार

 • 23 Feb 2021 10:38 AM (IST)

  संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे

  संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे :

  1. संजय राठोड हे सकाळी साधारण 9 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.
  2. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
  3. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
  4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
  5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
  6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.

 • 23 Feb 2021 10:21 AM (IST)

  संजय राठोड यांच्या घरासमोर पोलिसांचा एस्कोर्ट दाखल

  संजय राठोड यांच्या घरासमोर पोलिसांचा एस्कोर्ट दाखल, संजय राठोड यांच्याघरी स्थानिक नेते दाखल, राठोड यांच्या घरात पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती

 • 23 Feb 2021 09:58 AM (IST)

  संजय राठोड यांच्या घरी शिवसेना नेते यायला सुरुवात

  संजय राठोड यांच्या घरी शिवसेना नेते यायला सुरुवात, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड ,माजी आमदार विश्वास नांदेकर दाखल, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंतीवार

 • 23 Feb 2021 09:50 AM (IST)

  संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक राठोड यांच्या घरी दाखल

  – संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक राठोड यांच्या घरी दाखल

  – काही वेळेत निघणार असल्याची मेहुण्याची माहिती

 • 23 Feb 2021 09:32 AM (IST)

  संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक राठोड यांच्या घरी दाखल

  संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक राठोड यांच्या घरी दाखल, संजय राठोड काही वेळात निघणार असल्याची मेहुण्यांची माहिती

 • 23 Feb 2021 09:24 AM (IST)

  पोहरादेवी मंदीर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  पोहरादेवी मंदीर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप, पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 200 पोलिसांचा मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त, संजय राठोड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, पोहरादेवी मंदिर परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी केले सील, बॅरिगेट लावून पोलिसांनी केले सर्व रस्ते बंद, संजय राठोड यांच्या दौऱ्यावर ड्रोनच्या साहायाने पोलीस ठेवणार नजर

 • 23 Feb 2021 09:21 AM (IST)

  मंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्यावर ड्रोनद्वारे नजर

  मंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्यावर ड्रोनद्वारे असणार नजर, पोलिसांकडून दोन ड्रोन द्वारे ठेवली जाणार नजर

 • 23 Feb 2021 09:09 AM (IST)

  संजय राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं

  संजय राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलंय, पोहरादेवी येथे संजय राठोडांच्या स्वागताची तयारी

 • 23 Feb 2021 09:01 AM (IST)

  संजय राठोड यांचं संकट टळावं म्हणून पोहोरादेवी येथे हवन सुरु

  वन मंत्री संजय राठोड यांच्यावरील संकट टळावं म्हणून पोहोरादेवी येथे हवन सुरु

 • 23 Feb 2021 08:42 AM (IST)

  पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, पोहरादेवी मंदिरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी केले बंद, बॅरिगेट लावून पोलिसांकडून रस्ते केले बंद, 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात, मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू

 • 23 Feb 2021 08:35 AM (IST)

  पोहोरादेवीत 25 जणांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही, 240 पोलीस तैनात

  पोहोरादेवीत 25 जणांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही, 200 पोलीस कर्मचारी आणि 40 अधिकारी पोहोरादेवी तैनात, पोहोरादेवीच्या चारंही बाजूनं बॅरीकेटिंग, पोहोरादेवीत चोख पोलीस बंदोबस्त, पोलीस निरिक्षक अनिल ठाकरेंची माहिती

 • 23 Feb 2021 08:24 AM (IST)

  मंत्री संजय राठोड यांच्यावरील संकट टळावं, यासाठी पोहोरादीवी येथे आज हवन

  मंत्री संजय राठोड यांच्यावरील संकट टळावं, यासाठी पोहोरादीवी येथे आज हवन,  सुनील महाराज सपत्नीक करणार पुजा अर्चना,  पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अजून गुन्हा दाखल नाही,  शक्तीप्रदर्शन नाही, संजय राठोड यांच्यावर प्रेम करणारे लोक येणार

 • 23 Feb 2021 08:23 AM (IST)

  पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट सुरू

  पोहरादेवी – पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट सुरू, सुनील महाराज यांच्या वतीने करण्यात येतेय सजावट, साडेअकरा वाजता मंत्री संजय राठोड याच मंदिरात घेणार आहेत दर्शन, जगदंबा मंदिरात होम हवन आणि पूजेची करण्यात येतेय तयारी, मंदिरात होम हवन आणि सजावटीला सुरुवात

 • 23 Feb 2021 08:23 AM (IST)

  संजय राठोड यांच्या घरात असलेल्या वाहनाला करण्यात आले सॅनिटाईज

  संजय राठोड यांच्या घरात असलेल्या वाहनाला करण्यात आले सॅनिटाईज, वाहनात पाण्याच्या बॉटल ठेवत ठेवल्या

 • 23 Feb 2021 08:22 AM (IST)

  राठोड यांच्या दौऱ्यात उल्लेखित असलेले वाहन राठोड यांच्या घरासमोर दाखल

  संजय राठोड यांच्या घरासमोर आले शासकीय वाहन,  राठोड यांच्या दौऱ्यात उल्लेखित असलेले वाहन राठोड यांच्या घरासमोर दाखल, राठोड यांच्या घरी शासकीय वाहनातील पोलीस गार्ड दाखल, संजय राठोड यांच्या घरी पूजेचे साहित्य घेऊन कर्मचारी दाखल

 • 23 Feb 2021 08:21 AM (IST)

  संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन नाही, पोहोरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांचे वक्तव्य

  वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवीत आल्यावर सुरुवातीला जगदंबा मातेचं दर्शन घेणार आहे, पोहोरादेवीतील सराव मंदिरात संजय राठोड यांच्या हस्ते पुजेचं नियोजन, कोरोनामुळे लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन आम्ही केलंय,  आज संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन नाही, पोहोरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांचे वक्तव्य

 • 23 Feb 2021 08:21 AM (IST)

  वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवी येथे साडे अकरा वाजता पोहोचणार

  पोहोरादेवी येथे साडे अकरा वाजता पोहोचणार वनमंत्री संजय राठोड, पोहोरादेवीत बाँम्ब डिस्पोजल वॅन दाखल, पोलीस प्रशासन सज्ज, पोहोरादेवी येथे पोहोचणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेट्स लावण्याचं काम सुरु, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांकडून घेतली जातेय काळजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI