संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीकडे रवाना; शिवसेना नेतेही सोबत

शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. (maharashtra minister sanjay rathod going to poharadevi with family)

संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीकडे रवाना; शिवसेना नेतेही सोबत
संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 12:08 PM

यवतमाळ: शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. त्यांच्यासोबत यवतमाळचे शिवसेना नेतेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (maharashtra minister sanjay rathod going to poharadevi with family)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून संजय राठोड सार्वजनिक ठिकाणी आले नव्हते. ते यवतमाळ येथील त्यांच्या घरीही नव्हते. राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राठोड यांनी आज या नेत्यांशी बराचवेळ चर्चा केली. त्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले.

16 वाहनांचा ताफा

राठोड यांच्यासोबत 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहन, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे.

80 किलोमीटर प्रवास

राठोड हे यवतमाळ येथून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहे. हे अंतर यवतमाळ यांच्या घरापासून 80 किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांना दीड ते दोन तास पोहरादेवीत पोहोचायला लागणार आहेत. राठोड हे 80 किलोमीटर प्रवास करून जात असून ठिकठिकाणई त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.

सोबत कोण?

राठोड यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोड, मेव्हणे सचिन नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह काही शिवसेना पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येतं.

चौकशीतून सत्य बाहरे येईल

दरम्यान, या प्रकरणावर जितेंद्र महाराज यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पूजाच्या वडिलाची कोणतीही तक्रार नाही. मात्र, तरीही चौकशीतून सत्य बाहेर येईल, असं जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.

पोहरादेवीच्या चारही बाजूने बॅरिकेटिंग

राठोड आज पोहरादेवी मंदिरात दर्शनाला जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोहरादेवी मंदिरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी केले बंद केले आहेत. बॅरिकेट लावून पोलिसांकडून रस्ते बंद केले आहेत. 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात केले आहेत. तसंच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. (maharashtra minister sanjay rathod going to poharadevi with family)

राठोड यांचा असा असेल कार्यक्रम

1. संजय राठोड आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील. 2. सकाळी 12 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील. 3. दुपारी दीड वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील. 4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील. 5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील. 6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील. (maharashtra minister sanjay rathod going to poharadevi with family)

संबंधित बातम्या:

PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा

Sanjay Rathod | शिवसेना नेते संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(maharashtra minister sanjay rathod going to poharadevi with family)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.