Sanjay Raut : त्यांची मानसिक लेव्हल तपासली पाहिजे… तुमच्या छाताडावर बसणार; संजय राऊत संतापले
मी 25 वर्षांपासून खासदार आहे, त्यांना जर 25 वर्ष खासदार असलेला माणूस माहीत नसेल तर त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे अशी सडकून टीका राऊत यांनी केली.

निवडणुकीतील गैरप्रकार, मतदार यादीतील गोंधळ याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, निष्पक्ष निवडणुकांच्या मागणीसाठी काल आणि आज विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन देत काही मागण्याही केल्या. यामध्ये शरद पवार, उद्धवव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह अनेक प्रमनुख नेत्यांचा समावेश होता.सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे काल पहिल्यांदाच मंत्रालयात गेले, मात्र त्यावरूनही काही प्रतिक्रिया उमटल्या. टीका-टिपण्णी झाली. मात्र आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट भाष्य केलं.
किती माजी मुख्यमंत्री मंत्रालयात जातात ? पदावरून पायउतार झाल्यावर शक्यतो कोणी जात नाही. आता हे एकनाथ शिंदे, फडणवीस काय बोलतात ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला महाराष्ट्र सुखाने नांदवायचा असेल तर हे लोक काय बोलतात, त्यांनी काहीही केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस म्हणातात की संजय राऊत कोण ? मी 25 वर्षांपासून खासदार आहे, त्यांना जर 25 वर्ष खासदार असलेला माणूस माहीत नसेल तर त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे अशी सडकून टीका राऊत यांनी केली.
मानसिक लेव्हल तपासली पाहिजे
जो माणूस या राज्यात 4 वेळा खासदार झाला युतीमध्ये तर झालाच नंतरही झाला, तो माहीत नसेल, अशी बकवासगिरी राज्याचे मुख्यमंत्री करत असतील, तर त्यांची मानसिक लेव्हल तपसाली पाहिजे. उद्या आम्हीही म्हणू शकतो ना मोदी कोण ? आम्ही मोदी, अमनित शहा, देवेंद्र फडणवीस यांना थेट उत्तर देतो. हा कोण, तो कोण असं विचारत फिरत नाही. तुमचं अस्तित्व आहे, तसंच शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि राहणार. आणि आम्ही तुमच्या छाताडावर बसणार, देवेंद्र फडणवीस, हे लिहून ठेवा असा थेट इशारा राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
निवडणूक आयोगावर सडकून टीका
निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे. निवडणूक आयोग हा भाजप किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे असा आरोप राऊत यांनी केला. आम्ही राजकीय कार्यकर्ते मूर्ख आहोत का. त्यांच्याकडे काय यंत्रणा आहे. ते भाजपची यंत्रणा वापरत आहेत. निवडणूक आयोग हा भाजपाची बटीक झालाय अशी घणाघाती टीकाही राऊतांनी केली.
