AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत चार दिवस का गायब? स्वत:च सांगितलं कारण

ही घटना घडल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गायब झाले होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत यामागील कारण सांगितले.

संजय राऊत चार दिवस का गायब? स्वत:च सांगितलं कारण
sanjay raut
| Updated on: Apr 30, 2025 | 10:50 AM
Share

जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा उलटला आहे. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी आम्ही देशासोबत ही भूमिका घेतली आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गायब झाले होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत यामागील कारण सांगितले.

संजय राऊत यांनी चार ते पाच दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गैरहजेरीचे कारण सांगितले.

याला बदला म्हणतात का?

“मी गेले ४ ते ५ दिवस नव्हतो. राज्यात शांतता नांदावी असं मला वाटत होतं, असे संजय राऊतांनी म्हटलं. पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये. राजकारण कोण करतंय, भाजपच्या अनेक संस्था संघटना समाजमाध्यमांवर याचं राजकारण करत आहेत. हा हल्ला झाल्यावर २४ तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. एक सैनिक किंवा नागरिक मारला गेला तर अमेरिका, इस्त्रायल आणि रशियासारखी राष्ट्र जी स्वत:ला बलवान समजतात किंवा ५६ इंचाची छाती वाले समजतात. ते ताबडतोब प्रत्युत्तर देतात. आम्ही पाणी बंद केलं, पण पाणी असं बंद होत नाही. त्यासाठी मोठमोठे बंधारे, धरणं बांधावी लागतील, २० वर्षांनी जेव्हा ती धरणं उभी राहतील, तेव्हा ते पाणी बंद होईल. आम्ही पाकिस्तान २७ युट्यूब चॅनल बंद केली, याला बदला म्हणतात का?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

याला राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात

“त्यासोबतच 4PM नावाचे एक युट्यूब चॅनल बंद केलं. कारण हे चॅनल मोदी-शाहांच्या धोरणावर टीका करते. गेले ७ दिवस मोदींचे विविध फोटो आम्ही पाहतोय. ते सैन्य अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सरंक्षण मंत्री यांच्यासोबत ते बैठक घेतात, त्याबद्दल चर्चा करतात. त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानावर हल्ला करण्याचे ठरवले, तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल मानेक शॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीत. त्यांच्याशी युद्ध करायचं तुमची काय तयारी आहे. तुम्ही तयार आहात का, जनरल मानेक शॉ म्हणाले आम्हाला ८ दिवस द्या. यानंतर ८ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला. त्यांचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला याला राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात”, असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.