AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खोटेपणाची फॅक्टरी, स्वत: उघडे ना**… संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक क्रिकेट सामन्यांवरून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी फडणवीसांना अर्धवट ज्ञानी म्हटले आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या संकटाकडे दुर्लक्ष करण्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

भाजप खोटेपणाची फॅक्टरी, स्वत: उघडे ना**... संजय राऊतांचा हल्लाबोल
| Updated on: Aug 24, 2025 | 11:28 AM
Share

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारत-पाकिस्तान सामन्यांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असाल, महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपले कुंकू गमावले, त्यांच्या कुंकवाची त्यांना कदर असेल, तर ते अशी विधाने करणार नाहीत, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारत-पाक क्रिकेट सामन्यांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. संपूर्ण भाजप हे अर्धवट ज्ञानी आहेत. काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो. त्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचे व्हिडीओ पाहिले पाहिजेत. एकवचनी या पुस्तकात बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली. दिलीप वेंगसरकर अचानक जावेद मियादला घेऊन मातोश्रीवर आले. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करु नका, पुन्हा सुरु करा, ही विनंती करण्यासाठी ते बाळासाहेबांकडे आले होते. तेव्हा बाळासाहेबांनी दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही, असे सांगितले आहे. तुमच्या नरेंद्र मोदींसारखे शेपूट घालणारे नाहीत, असे संजय राऊत म्हटले.

कुंकवाची कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत

ऑपरेशन सिंदूरच्या वेळी रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे मोदी म्हणाले. चहा प्या आणि निघून जा, असे बाळासाहेबांनी तोंडावर मियादला सांगितलं. याबद्दल तुम्ही दिलीप वेंगसरकर यांना विचारु शकता. देवेंद्र फडणवीस खरंच राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असतील. महाराष्ट्रातील ज्या महिलांचे कुंकू पुसलं, त्या कुंकवाची कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत. जावेद मियाद सोड ना.. आताच बोला, असे सांगत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

तुम्ही स्वत: उघडे नागडे पडले आहात

तुम्ही बेल्जियममध्ये आरशाची फॅक्टरी काढली. तिथे चांगले आरशे मिळतात. तिथे तुमच्या आरशाची फॅक्टरी आहे ना, त्यात पाहा, तुम्ही त्या विवस्त्र दिसाल. तुम्ही स्वतला विवस्त्र पाहाल. पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का इतकंच हो की नाही हे सांगा. हे फालतू जावेद मियादाद, वासिम अकरम वैगरे बोलू नका. भाजपने पाकड्यांसमोर पैशांसाठी शेपूट घातलं आहे. तुम्ही कोणाची तरफदारी करताय. काल काही लाडक्या बहि‍णींना राखी बांधून घेतल्यात. ज्या २६ महिलांचे कुंकू पुसले त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत. भाजप म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे. जावेद मियादादचा विषय किती वर्षे काढताय. पंडीत नेहरु काढतात. त्यापेक्षा स्वत:च बोला. तुम्ही स्वत: उघडे नागडे पडले आहात, ते पाहा, अशी टीका संजय राऊतांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.