Ranjitsinh Disale | डिसले गुरुजींना डाक विभागाचं खास गिफ्ट, पोस्टाचं तिकीट जारी

Ranjitsinh Disale | डिसले गुरुजींना डाक विभागाचं खास गिफ्ट, पोस्टाचं तिकीट जारी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले गुरुजींना डाक विभागाने एक खास गिफ्ट दिलं आहे.

Nupur Chilkulwar

|

Dec 07, 2020 | 9:59 AM

सोलापूर : आंतरराष्ट्रीय पातळीवरील 7 कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेल्या (Ranjitsinh Disale Postage Stamp Launch) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले गुरुजींना डाक विभागाने एक खास गिफ्ट दिलं आहे. ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसलेंवर पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले आहे (Ranjitsinh Disale Postage Stamp Launch).

सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिकीट जारी करण्यात आले आहे. या तिकिटाचे वितरण नुकतेच रणजितसिंह डिसले यांच्या घरी एका कार्यक्रमात करण्यात आले. सोलापूर डाक विभागाच्या माय स्टॅम्प योजनेअंतर्गत हे पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले आहे. या तिकिटावर डिसले गुरुजींचा फोटो आहे. सोलापुरातील बार्शी येथील डाक विभागाकडून झालेल्या या सन्मानाने डिसले गुरुजी भारावून गेले होते.

“डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या”

त्याशिवाय, ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदाराच्या मुलीने केली आहे. शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आणि स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करावा, अशी भूमिका मांडली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे (Ranjitsinh Disale Postage Stamp Launch).

डिसले गुरुजी ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डीसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कारातील 50 टक्के रक्कम इतर शिक्षकांना

रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या 9 शिक्षकांचादेखील सन्मान होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. दरम्यान, रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. तसेच, हा राज्यातील सर्व शिक्षकांचा गौरव असल्याची भावना रणजितसिंह यांनी व्यक्त केली आहे.(Ranjitsinh Disale Postage Stamp Launch)

डिसले गुरुजींचं मार्गदर्शन घेणार- मुख्यमंत्री

पुरस्काराची मिळालेली 7 कोटी रुपयाची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे गुरुजींनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे तसंच मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे गुरुजींचं मार्गदर्शन घेतले जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Ranjitsinh Disale Postage Stamp Launch

संबंधित बातम्या :

अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान

जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे

‘राज्याला आपला अभिमान’, डिसले गुरुजींच्या पाठीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें