पंजाबमधील महिला व्हिलचेअरवर खिळलेली, विठ्ठल दर्शनाची आस स्वस्थ बसू देईना मग…

गुरुग्रंथसाहेब वाचून एका महिलेला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. पण, शरीर साथ देत नव्हते. त्या व्हिलचेअरवर होत्या.

पंजाबमधील महिला व्हिलचेअरवर खिळलेली, विठ्ठल दर्शनाची आस स्वस्थ बसू देईना मग...
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 9:45 PM

सोलापूर : पंढरपूरच्या विठुरायाची महिमा न्यारी आहे. महाराष्ट्राचे विठ्ठल हे दैवत आहे. पण, राज्याबाहेरील भाविकही विठ्ठल दर्शनासाठी येतात. पंढरपूरचा विठुराय भाविकांना सुखावतो. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. संत नामदेव यांनी विठुरायाचे वर्णन पंजाबपर्यंत पोहचले. त्यामुळे गुरु ग्रंथसाहेबमध्ये विठ्ठलाचे वर्णन करण्यात आले आहे. गुरुग्रंथसाहेब वाचून एका महिलेला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. पण, शरीर साथ देत नव्हते. त्या व्हिलचेअरवर होत्या. त्यामुळे आता दर्शन कसे घेता येणार असा प्रश्न त्यांना पडला.

नाकात नळी, पायात त्राण नाही

पण, त्या महिलेने हार मानली नाही. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विठ्ठलाचे दर्शन दाखवण्याचे ठरवले. महिलेच्या नाकात ऑक्सिजनसाठी नळी लावण्यात आली आहे. शिवाय त्या दोन पाऊलं टाकू शकत नाही. तरीही नातेवाईकांनी त्यांना विठ्ठल दर्शनासाठी आणले.

हे सुद्धा वाचा

pandharpur 2 n

नामदेव महाराज यांच्या अभंगातून ओढ

पंढरपुरात उतरल्यानंतर त्यांना व्हिलचेअरवर बसवून पंढरपुरातील परिसर फिरवण्यात आला. दर्शनाची ओढ त्यांना गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथातून लागली. या ग्रंथात संत नामदेव महाराज यांच्या अभंगांना स्थान देण्यात आले आहे. त्यातून त्यांनी ही प्रेरणा मिळाली.

विठ्ठलाच्या गर्भगृहापर्यंत पोचली

सावळ्या विठुरायाची भूरळ आजवर अनेकांना‌ पडली. अशाच पंजाबमधील‌ एका गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महिला भाविक रुग्णास विठ्ठल दर्शनाची ओढ लागली होती. ती आजारी महिला आज व्हीलचेअरवरून श्री विठ्ठलाच्या गर्भगृहापर्यंत पोचली. अन् विठ्ठल दर्शनाने सुखावली गेली.

नामदेव पायरीचेही घेतले दर्शन

संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगातून विठुरायाचे वर्णन पंजाब प्रांतापर्यंत नेले. गुरू ग्रंथसाहेबमध्ये देखील नामदेव ‌महाराजांच्या अभंगांना मानाचे स्थान आहे. त्याच गुरू ग्रंथसाहेबांच्या दर्शनाची ओढ विठ्ठल रूपात रूपांतरीत झाली. पंजाबचे भाविक पंढरीच्या देवाची याद्वारी येवून पोचले. विठ्ठलासोबत संत नामदेव पायरीचेही त्यांनी दर्शन‌ घेतले.

विठुरायाचा दर्शन घेतल्यानंतर मन सुखावते. याची अनुभूती पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाने होते. त्यासाठी ही महिाल पंजाबवरून व्हिलचेअरवर असताना आली. त्यामुळे तिच्या भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच तिला मदत करणाऱ्यांचेही कौतुक होत आहे.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.