नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Jan 31, 2022 | 1:05 PM

पतीच्या निधनानंतर वियोग सहन न झाल्यामुळे दीड तासात पत्नीनेही प्राण सोडले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ही घटना घडली.

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास
सोलापुरात दाम्पत्याचा मृत्यू

सोलापूर : साता जन्मांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं अनेकदा म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकताना आयुष्यभर साथ देण्याच्या घेतलेल्या आणाभाका अखेरच्या क्षणापर्यंत निभावणारे फार कमी असतात. कारण कधी जोडीदार साथ सोडून निघून जातो, तर कधी काळाच्या रुपाने नियती त्याला हिरावून नेते. पतीच्या निधनानंतर अवघ्या दीड तासांच्या काळात पत्नीनेही जगाचा निरोप (Husband Wife Death) घेतला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जवळपास 65 वर्षांच्या संसारानंतर नियतीने या दाम्पत्याची ताटातूट करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचे नाते इतके घट्ट बांधले होते, की मृत्यूही त्यांना विलग करु शकला नाही. 90 वर्षांच्या पतीने अखेरचा श्वास घेतल्यानंतर केवळ 90 मिनिटांत त्यांच्या 80 वर्षीय अर्धांगिनीनेही डोळे मिटले. एकामागून एक आजी-आजोबांचे छत्र हरपल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पतीच्या निधनानंतर वियोग सहन न झाल्यामुळे दीड तासात पत्नीनेही प्राण सोडले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ही घटना घडली. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी लगीनगाठ बांधून चतुराबाई खुने कुटुंबात आल्या होत्या. त्यावेळी बाबुरावही जेमतेम 25 वर्षांचे होते. त्यानंतर उभी हयात दोघांनी एकत्र घालवली. त्यामुळे पतीच्या पश्चात आयुष्याची कल्पनाही सहन न झाल्यामुळे ऐंशी वर्षांच्या माऊलीने जगाचा निरोप घेतला.

आजारपणामुळे पतीचे निधन

65 वर्षांपासून संसारात साथ देणाऱ्या पतीच्या निधनाने धक्का बसलेल्या पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला. पतीचे आजारपणामुळे निधन झाले, त्यानंतर दुःख सहन न झाल्याने दीड तासात पत्नीनेही प्राण सोडले.

कुटुंबीयांवर दुःखाचा आघात

बाबुराव खुने (वय 90 वर्ष) आणि चतुराबाई खुने (वय 80 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. एकामागून एक पती-पत्नीने जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत आहेत. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

लेकाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना दाम्पत्यावर काळाचा घाला, कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

VIDEO : ब्रेक फेल झालेला टेम्पो आठवडी बाजारात घुसला, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, 16 जण जखमी

पेस्ट कंट्रोलनंतर हलगर्जी जीवावर, पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI