Dattatraya Bharane: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाह्यवळण रस्त्यालगत भर उन्हात फळविक्री करणाऱ्यांना दिली मायेची सावली…

गेल्या काही दिवसात इंदापूरचे तापमान 40 ते 42  अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे. हे लक्षात घेत स्वतः दत्तात्रय भरणे यांनी महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यालगत फळविक्री करणा-यांना पन्नासेक छत्र्या सावलीसाठी भेट दिल्या आहेत. कायम सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळखले जाणारे भरणे मामा या कृतीमुळे अनेकांची मने जिंकून गेले आहेत.

Dattatraya Bharane: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाह्यवळण रस्त्यालगत भर उन्हात फळविक्री करणाऱ्यांना दिली मायेची सावली...
Minister of State Dattatraya BharaneImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 7:58 PM

इंदापूर- राज्यात सर्वत्राच उन्हाचा तडाखा तीव्र आहे.  अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात अनेकदा ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला फळे, थंडपाण्याची विक्री करणारे फळविक्रेते दिसतात. मात्र त्यांची दखल फारशी घेतली जात नाही. भर उन्हात फळांची विक्री (fruit sellers)करत असताना त्यांच्याडोक्यावर  सावलीसाठी साधे छतही नसलेले दिसून येते. दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane)सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना सतत सोलापूरला ये जा करावी लागते. इंदापूरहून(Indapur)   जाताना महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या फळविक्रेत्यांकडील फळांचा, विशेषतः पेरुंचा आस्वाद ते व सोबतचे कार्यकर्ते घेतात.(त्याचे पैसे देतात बर का) गेल्या काही दिवसात इंदापूरचे तापमान 40 ते 42  अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे. हे लक्षात घेत स्वतः दत्तात्रय भरणे यांनी महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यालगत फळविक्री करणा-यांना पन्नासेक छत्र्या सावलीसाठी भेट दिल्या आहेत. कायम सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळखले जाणारे भरणे मामा या कृतीमुळे अनेकांची मने जिंकून गेले आहेत.

डोक्यावरच्या छताची सोय केली

या फळविक्रेत्यांचा दिवस सकाळी सातला उगवतो व रात्री उशीरा मावळतो. टळटळीत मस्तक भाजवणा-या उन्हाच्या धगीवर त्यांचे स्वयंपाकघर चालत असते.मुलांच्या भवितव्यासमोरचा अंधार ते दूर करत असतात.त्यांना ही मायेची सावली मिळायला हवी,या विचाराने आज भरणे यांनी छत्रीच्या रुपाने डोक्यावरच्या छत्राची सोय करुन टाकली. ती ही कोणता पोकळ आव न आणता. भरणे यांचे पुतणे प्रितेश भरणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, दीपक जाधव, लक्ष्मण जाधव, शिवाजी तरंगे, सचिन खामगळ, अक्षय कोकाटे, सागर पवार, गनीम सय्यद, विठ्ठल महाडीक, सचिन शिरसठ यांच्या उपस्थितीत फळ विक्रेत्यांना छत्र्या देण्यात आल्या.. कष्टाला सीमा नसते,तसेच दातृत्व देखील असीम असते,हे कृतीतून आज पुन्हा भरणे यांनी दाखवून दिले आहे. त्याच्या या कृतीचे सर्वसामान्य नागराईकांच्या कडून कौतुक केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.