AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरच्या मारकडवाडीमध्ये आज पुन्हा मतदान; पोलिसांकडून जमावबंदी, गोळ्या घातल्या तरी मतदान करणार, नागरिक ठाम

Solapur Markadvadi Voting : सोलापुरच्या मारकडवाडीमध्ये आज पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. गोळ्या घातल्या तरी मतदान करणार, असं म्हणत मारकडवाडी गावचे नागरिक मतदानावर ठाम आहेत. वाचा सविस्तर...

सोलापूरच्या मारकडवाडीमध्ये आज पुन्हा मतदान; पोलिसांकडून जमावबंदी, गोळ्या घातल्या तरी मतदान करणार, नागरिक ठाम
मारकडवाडीमध्ये आज पुन्हा मतदानImage Credit source: tv9
| Updated on: Dec 03, 2024 | 8:35 AM
Share

नुकतंच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. असं असताना महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील लोकांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सोलापूरच्या माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून ही मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध करत गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावामध्ये भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिक मतदान मिळाली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी ईव्हीएम संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेऊन वास्तव समोर आणण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना नोटीस देण्यात आल्या असून गावात जमावबंदी लागू केली आहे.

मारकडवाडी गावचे गावकरी मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र नागरिक मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत. लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणारच असं म्हणत नागरिकांनी निर्धार बोलून दाखवला आहे.

उत्तम जानकर काय म्हणाले?

मारकडवाडीत आज मतदान प्रक्रिया पार राबवण्यावर आमदार उत्तम जानकर ठाम आहेत. निवडणूक आयोगाला आम्हाला दाखवायचे आहे की ईव्हीएम पद्धतीमध्ये घोळ आहे. माजी आमदार विकास कामे केल्याचा दावा करतात मात्र प्रत्यक्षात इथे काहीही झालेलं नाही. राम सातपुते यांनी 21 कोटीची कामे केल्याचा दावा केला. मात्र त्यातले पावणे 21 कोटी गडप केले असावेत. लोकसभेला भाजपला 54 हजार मतं होती. मग आता 1 लाख 8 हजार मतं कशी मिळाली असा सवाल आहे. एकास एक पद्धतीने या ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा संशय वाटतो. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे अशी आमची भूमिका आहे, असं उत्तम जानकर म्हणालेत.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....