AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलचा कार्यक्रमाचं आयोजित केला अन् प्रकरण अंगाशी आलं; थेट गुन्हा दाखल

Gautami Patil Lavani Program Case Filed Against Organizer : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं महागात, आयोजकाविरोधात गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण...

गौतमी पाटीलचा कार्यक्रमाचं आयोजित केला अन् प्रकरण अंगाशी आलं; थेट गुन्हा दाखल
| Edited By: | Updated on: May 15, 2023 | 3:11 PM
Share

सोलापूर : नृत्यांगणा गौतमी पाटील हीचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. तिचा कार्यक्रम असला की लोक तुफान गर्दी करतात. गावगावात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. कार्यक्रमाचं आयोजन झालं की गावातल्या पारावर, रस्यावर मैदानात अन् अक्षरश: झाडावर बसून लोक कार्यक्रम बघतात. एवढा मोठा प्रतिसाद मिळणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं आयोजकाला महागात पडलंय. आयोजकावर गुन्हा दाखल झाला आहे.

आयोजकांवर गुन्हा दाखल

त्याचं झालं असं की, सोलापूरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. पण गौतमीचा हा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकाला चांगलच महागात पडलंय. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र भगवान गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचं नाव आहे. राजेंद्र गायकवाड यांच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

12 मेला बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसानी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचं गायकवाड यांना लेखी कळवलं होतं. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी नियमांचा भंग करत थेट कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामुळे आयोजकांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल

गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच हा तक्रार अर्ज दाखल केलाय.

माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गायकवाड यांनी पोलिसात तक्रारीत म्हटलं आहे. 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली. पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला, असं राजेंद्र गायकवाड म्हणाले आहेत.

या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून जास्तीचे पैसे घेतले. तसंच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचंही तक्रारदार राजेंद्र गायकवाड याने आपल्या तक्रारीत म्हटलंय.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.