मशीदीतून निघणाऱ्या ‘त्या’ फतव्यांचा निषेध; राम सातपुते नेमकं काय म्हणाले?

Ram Satpute on Solapur Loksabha Election 2024 : बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या मिरवणुकीत भाजपच्या राम सातपुतेंनी धरला ठेका... माध्यमांशी बोलताना राम सातपुते यांनी त्या फतव्याचा निषेध केला आहे. तसंच आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर...

मशीदीतून निघणाऱ्या 'त्या' फतव्यांचा निषेध; राम सातपुते नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 3:24 PM

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मस्जिदमधून काही फतवे निघत असल्याचा दावा केला आहे. जिहादींना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता राहिलेली आहे. MIM ने उमेदवार दिलेला नाही. कारण काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत मशिदीमधून फतवे निघत आहेत. मात्र सातव्या विरोधात येथील समाज एक होईल आणि मोदीजींच्या पाठीशी उभा राहील. नरेंद्र मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मी त्याचा निषेध करतो, असं राम सातपुते म्हणाले. सोलापुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा हे वक्तव्य केलं आहे.

राम सातपुते काय म्हणाले?

संविधान वाचवण्यासाठी मोदीजींच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं. मशिदीतून फतवे काढून संविधानाला तुला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. सोलापुरात मुलींना पाडण्यासाठी मौलवी फिरत आहेत. वेगवेगळे पत्रक काढले जात आहेत, असा दावा राम सातपुते यांनी केला आहे.

मिरवणुकीत राम सातपुतेंनी धरला ठेका

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या मिरवणुकीत भाजपच्या राम सातपुतेंनी ठेका धरला. सोलापुरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची सांगता झाली. यावेळी उत्सव मिरवणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते यांनी ठेका धरला. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सर्वात मोठी मिरवणूक सोलापुरात निघते. या मिरवणुकीत लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी ठेका धरला.

राम सातपुते यांनी विविध जयंती उत्सव मंडळांना भेटी देत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी राम सातपुते यांनी आंबेडकर अनुयायांना जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राम सातपुते म्हणाले….

मराठा आरक्षण मुद्द्यावरही राम सातपुते यांनी भाष्य केलं. सोलापूर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संकल्प बोलून दाखवला. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही, असं राम सातपुते म्हणाले. अक्कलकोट भागामध्ये अवकाळी मुळे जे नुकसान झाले त्याबाबत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.