AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : सरकारचा बडा नेता निघाला, रणरणत्या ऊन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना थोड्याचवळात भेटणार

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची काल राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती.

Manoj Jarange Patil :  सरकारचा बडा नेता निघाला, रणरणत्या ऊन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना थोड्याचवळात भेटणार
Manoj Jarange Patil
| Updated on: May 30, 2026 | 10:33 AM
Share

अंतरवाली सराटीत रखरखत्या ऊन्हात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. ऊन्हाळ्याचे दिवस असून वरुन सूर्य आक ओकत आहे. मनोज जरांगे पाटील यांची काल राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती. काही वेळात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आश्वासनाचं पत्र घेऊन पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. संभाजीनगरहून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील रवाना झाले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीच्या परिसरात मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्ट मंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतरही ते उपोषणावर ठाम होते. आज मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज ड्राफ्ट मिळू शकतो. पण त्यांना ड्राफ्ट नकोय. ड्राफ्ट आम्ही स्वीकारु पण सरकारी अधिकाऱ्यांना आदेश द्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

तर तुम्हाला निलंबित करण्यात येईल

58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन वॅलिडिटी देण्यात यावी ही जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. सरकार प्रशासनाने तसा आदेश काढावा. कारण ड्राफ्ट सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. आदेश द्या जर प्रमाणपत्र वॅलिडिटी दिली नाही, तर तुम्हाला निलंबित करण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश पोहोचला पाहिजे असं ते म्हणाले. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढला तर सामान्य लोक तो सूचना, आदेश दाखवतील असं मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरु करताना बोलले. मला माझी फिकिर नाही. मराठा समाजाचं हित महत्वाचं आहे असं ते म्हणाले.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल