AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी माझं सर्वस्व गमावलं, सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, बारामतीच्या स्टेजवर नेमकं काय घडलं?

बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची सांगता सभा आज बारामतीमध्ये पार पडली, यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

मी माझं सर्वस्व गमावलं, सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, बारामतीच्या स्टेजवर नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 6:19 PM
Share

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये महायुतीची सांगता सभा पार पडली. या सभेत बोलताना सुनेत्रा पवार या अजितदादांची आठवण निघताच चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. या निवडणुकीत सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानते. अजित पवार यांच्या आजी शारदाबाई पवार यांचेही खूप आभार मानते, कारण त्यांनी कुटुंबापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काम केलं. शरद पवारांचे आशीर्वाद अतिशय महत्वाचे आहेत. आशा ताई पवार सर्वात मोठा आधार आहेत, असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? 

आज प्रचार सभेची सांगता होतं आहे. या प्रांगणात अजित पवारांचा नागरी सत्कार तुम्ही केला आहे. सांगता सभेला उसळलेला जनसागर पाहता ही दादांच्या कामाची पोचपावती आहे. मागील ३५ वर्ष शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत बारामती अजित पवारांनी उभी केली. अजूनही बारामतीकर दादांच्या आठवणीत शोककुल आहेत. बारामतीकर अजूनही त्यांचे रील पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत राहत. अनेकांना वाटत अजित पवार परत येतील परंतु आता ते आपल्याला नाहीत, असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बारामतीला देशात 1 नंबर करण्याच स्वप्न अजित पवारांच होतं. वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त या जोरावर राज्याची आर्थिक घडी त्यांनी बसवली. त्यांनी विकासाच्या आड कधीच राजकारण आणलं नाही. लोकांच्या मनात त्यांनी कामाच्या माध्यमातून स्थान निर्माण केलं होतं. बारामतीतील 3 पिढ्या दादांच्या कार्याशी आणि कामाशी जोडल्या गेल्या आहेत. मला आणि माझ्या 2 मुलाना लोकांचं भरभरून प्रेम आणि आधार मिळाला आहे.

दादांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी रणांगणात उतरली आहे. माझ्यासाठी हा प्रवास सोप्पा नाही, मात्र बारामतीकरांची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे. मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. माझ दुःख मोठ आहे. मी माझ  सर्वस्व गमावलं आहे, असंही यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं, दरम्यान यावेळी बोलताना त्या चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

Follow Us
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.