राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु, कोरोना निर्बंधांसह कोणत्या विषयांवर चर्चेची शक्यता?

हॉटेल, रेस्टॉरंट्स यांना वेळ वाढवून देणे, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करणे, नियमांसह मॉल्स सुरु करणे, यासह राज्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यात व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 11 जिल्ह्यातील चिंताजनक स्थितीवरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु, कोरोना निर्बंधांसह कोणत्या विषयांवर चर्चेची शक्यता?
राज्य मंत्रिमंडळ बैठक
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 4:23 PM

मुंबई : कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. पूरग्रस्तांसाठी मदत आणि कोरोना निर्बंधांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स यांना वेळ वाढवून देणे, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करणे, नियमांसह मॉल्स सुरु करणे, यासह राज्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यात व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 11 जिल्ह्यातील चिंताजनक स्थितीवरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (State Cabinet meeting begins at Sahyyadri Guest House, what issues are likely to be discussed?)

त्याचबरोबर पूरग्रस्त भागाचा आढावा, पंचनामे किती झाले, त्यानुसार पॅकेजमध्ये बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव मागील मंत्रिमंडळ बैठक आला होता. त्यावरही या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत खालील विषयांवर चर्चेची शक्यता

>> 3 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त कायम करणे >> राज्यातील पीक-पाणी परिस्थितीचा आढावा >> कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा आणि सादरीकरण >> नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रीत) या संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याबाबत >> भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सादरीकरण

28 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते, त्यात

>> पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना मदत दिली जाणार >> स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा 2 राज्यात राबविणार >> महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण, यंत्रणा स्थापन करण्यास मान्यता >> सात अध्यापकीय पदांना सातवा वेतन आयोग >> कोविड कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच

लोकल प्रवासासाठी महत्वाच्या अटी

लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.

इतर बातम्या :

Weather Update : राज्यात पावसाचं कमबॅक कधी? हवामान विभागानं काय सांगितलं?

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय?; ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा आजच आहारात समावेश करा!

State Cabinet meeting begins at Sahyyadri Guest House, what issues are likely to be discussed?

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.