Corona Vaccine Death : लसीच्या डोसनंतर विद्यार्थिनीचा मृत्यू; 1 हजार कोटींच्या भरपाईची मागणी

याचिकेत म्हटल्यानुसार, लुणावत यांची मुलगी स्नेहल हिने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्या लसीच्या डोसचा दुष्परिणाम होऊन स्नेहलचे 1 मार्च 2021 रोजी निधन झाले. केंद्र सरकारच्या AEFI समितीनेही स्नेहलचा मृत्यू कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे मान्य केले आहे.

Corona Vaccine Death : लसीच्या डोसनंतर विद्यार्थिनीचा मृत्यू; 1 हजार कोटींच्या भरपाईची मागणी
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Feb 02, 2022 | 1:45 AM

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामांमुळे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका(Petition) दाखल केली आहे. याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मुलीच्या मृत्यूसाठी 1,000 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई(Compensation)ची मागणी केली आहे. माझी मुलगी स्नेहल हिला लस घेण्यापूर्वी संबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. स्नेहल ही आरोग्य सेविका होती. त्यामुळे तिला लस घेण्यास भाग पाडले होते. तिने लस सुरक्षित असल्याच्या हमीच्या आधारे लस घेतली होती. मात्र लस सुरक्षित असण्याचा दावा खोटा ठरला आहे. तिचा लसीच्या दुष्परिणामांमुळेच मृत्यू झाला, असा दावा करीत याचिकाकर्ते लुणावत यांनी भरपाईची मागणी केली आहे. (Student dies after vaccine dose; Demand for Rs 1,000 crore compensation)

लस सुरक्षित असल्याचा दावा खोटा

लुणावत यांनी आपल्या याचिकेत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या संचालकांनाही जबाबदार धरले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या संचालकांनी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. वास्ताविक हा दावा खोटा असल्याचे मुलीच्या मृत्यूमुळे सिद्ध झाले आहे, असे लुणावत यांनी याचिकेत म्हटले आहे. डिसीजीआय आणि एम्सच्या पोकळ दाव्यांमुळेच माझ्या मुलीसारख्या आरोग्य कर्मचार्‍यांना लस घेणे भाग पडले, याकडे लुणावत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

आणखी लोकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका रोखायचाय!

याचिकेत म्हटल्यानुसार, लुणावत यांची मुलगी स्नेहल हिने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्या लसीच्या डोसचा दुष्परिणाम होऊन स्नेहलचे 1 मार्च 2021 रोजी निधन झाले. केंद्र सरकारच्या AEFI समितीनेही स्नेहलचा मृत्यू कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे झाल्याचे मान्य केले आहे. “माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच प्रतिवादी अधिका-यांच्या बेकायदेशीर कृतीमुळे आणखी काही लोकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका रोखण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे,” असे म्हणणे लुणावत यांनी मांडले आहे.

याचिकेत सिरम इन्स्टिट्यूट, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार प्रतिवादी

लुणावत यांच्यावतीने अभिषेक मिश्रा आणि दीपिका जैस्वाल या अधिवक्त्यांनी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला, बिल गेट्स (SII मध्ये भागीदार), महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, DCGI आणि एम्सचे संचालक गुलेरिया यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. न्यायालयाने माझ्या मुलीच्या मृत्यूबद्दल 1000 कोटी रुपयांची अंतरिम भरपाई देण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत, सरकार भरपाईची ही रक्कम पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून वसूल करू शकते, असे लुणावत यांनी याचिकेत नमूद केले आहे. (Student dies after vaccine dose; Demand for Rs 1,000 crore compensation)

इतर बातम्या

Murbad : मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरांवर धाडसत्र सुरूच, आणखी दोन ‘देव माणूस’ पोलिसांच्या ताब्यात

Bhiwandi Crime : भिवंडीत स्फोटकांसह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, आरोपींकडून 1000 जिलेटीन व डीटोनेटर हस्तगत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें