सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात ईव्हीएम सापडल्याची अफवा, परिसरात गोंधळ

अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात काल (21 ऑक्टोबर) ईव्हीएम सापडल्याने एकच खळबळ (EVM found rumor chandrapur) उडाली होती.

EVM found rumor chandrapur, सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात ईव्हीएम सापडल्याची अफवा, परिसरात गोंधळ

चंद्रपूर : अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात काल (21 ऑक्टोबर) ईव्हीएम सापडल्याच्या अफवेने एकच खळबळ (EVM found rumor chandrapur) उडाली होती. ही घटना चंद्रपूर येथील बल्लारपूर मतदारसंघात घडली. या अफवेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मात्र हे ईव्हीएम (EVM found rumor chandrapur) बेवारस नसून राखीव असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बल्लारपूर मतदारसंघातील दुर्गापूर शहरात एका खासगी वाहनात ईव्हीएम सापडल्याने गावकऱ्यांनी एकच गोंधळ केला होता. या ईव्हीएची चौकशी करावी यासाठी खाजगी वाहनाला गावकऱ्यांनी घेराव घालत वाहन पोलीस स्टेशनमध्ये नेले होते. ईव्हीएम सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.

बेवारस ईव्हीएम सापडल्याच्या अफवेने रात्री खळबळ उडाली होती. आंबेडकर वॉर्डातील मतदान केंद्रासमोरी तवेरा गाडीत या ईव्हीएम मशीन आढळल्या होत्या. या प्रकारानंतर मतदारसंघातील उमेदवारही आक्रमक झाले होते. ईव्हीएम सापडल्याचा अफवेने या भागात हजारोंची गर्दी झाली होती. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर जिल्हाधिका-यांनी पोलीस अधिक्षकांसह घटनास्थळी पोहचून ते राखीव ईव्हीएम असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मतदारसंघातील उमेदवारांना समक्ष बोलावून गाडीत असलेले ईव्हीएम हे राखीव असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारानंतर विभागातील गर्दी मावळली.

दरम्यान, महराष्ट्राचे अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर काँग्रेसकडून डॉ. विश्वास झाडे यांना हे मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *