AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | Honey Trap | जपून चाल… पुढे धोका आहे…. हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (What Is A Honey Trap) यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी गेल्या आठवड्यात पुढे आल्या. रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Special Story | Honey Trap | जपून चाल... पुढे धोका आहे.... हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?
धनंजय मुंडे
| Updated on: Jan 17, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : गेल्या आठवड्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (What Is A Honey Trap) यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी पुढे आल्या. याला कारण ठरलं रेणू शर्मा नावाच्या महिलेचे धनंजय मुंडेंवरील गंभीर आरोप. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वत: या विषयावर स्पष्टीकरण दिलं (What Is A Honey Trap).

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.”

“करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.”

“मात्र, 2019 पासून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता”, सोशल मीडियावर पोस्ट करत धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.

कृष्णा हेगडेंचे रेणू शर्मावर ब्लॅकमेलिंगचे आरोप

त्यानंतर भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभार आरोप केले. “रेणू शर्माने मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्याशिवाय, मनसे नेते मनिष धुरी यांनीही रेणू शर्मावर हनी ट्रॅप करण्यासाठी आरोप केलेत.

मनिष धुरी काय म्हणाले?

ते म्हाणाले, “जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही (रेणू शर्मा) आणि हिचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय”.

यासर्व प्रकारावरुन या प्रकरणाला एक वेगळं वळण आलं. कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण बलात्काराच्या आरोपावरुन हनी ट्रॅपकडे वळलं. दरम्यान, रेणू शर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तरी, दोन नेत्यांच्या या वक्तव्यामुळे हे प्रकरण हनी ट्रॅपचं असण्याचा संशय बळावला आहे. पण, अद्याप त्याविषयी काही ठोस माहिती नाही.

पण, एकीकडे बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेली महिलाच आता हनी ट्रॅप करणारी टोळी चालवत असल्याचे आरोप होत आहेत. त्यातून धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा, त्यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव सुरु आहे की काय अशी चर्चा पक्ष अन्य पातळीवर सुरु आहे (What Is A Honey Trap).

हनी ट्रॅप म्हणजे काय?

एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आलं होतं. हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार यासर्वांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याची अनेक उदाहरण सापडतील. सेक्स व्हिडीओ, अश्लील चॅट या सगळ्यांवरुन या दरम्यान ब्लॅकमेलिंग केलं जातं.

राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रांत हनी ट्रॅप चालतं. गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी याचा वापर होतो. हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो (What Is A Honey Trap).

हेही वाचा

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?

“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

(What Is A Honey Trap)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.