बारामतीत सुनेत्रा ताईंचा पराभव निश्चित आहे… आशिष शेलार हे काय बोलून गेले?; चर्चा तर होणारच !

ठाकरे गटाचं नवं शिवसेना गीत आलं आहे. हे गाणं उबाटा गटातील लोकही ऐकत नाहीत. नवं गाणं सपशेल फेल आहे. मातोश्रीच्या शेजारील बंगल्यातील लोकांनाही नवं गीत माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

बारामतीत सुनेत्रा ताईंचा पराभव निश्चित आहे... आशिष शेलार हे काय बोलून गेले?; चर्चा तर होणारच !
ashish shelarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 4:38 PM

निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्ष आणि राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप होत आहेत. काही नेत्यांची जीभ घसरतानाही दिसत आहेत. तर काहींकडून अनावधानाने चुकीची विधाने केली जात आहेत. त्यानंतर मात्र सारवासारव केली जात आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडूनही अशीच एक अनावधानाने चूक घडली. त्यांना बारामतीबाबतचा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. अत्यंत आत्मविश्वासाने शेलार यांनी उत्तर दिलं. नंतर चूक लक्षात आली आणि मग त्यांना सारवासारव करावी लागली. आपल्या या विधानाबाबत त्यांनी माफीही मागितली.

आशिष शेलार काल पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. शेलार यांना बारामतीबाबतचा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्यांनी बिनदिक्कतपणे उत्तर दिलं. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव निश्चित आहे, असं शेलार म्हणाले. हे विधान केल्यानंतर शेलार यांच्या चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी माफी मागत शब्द मागे घेतला. त्यानंतर, सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असं सांगत चूक दुरुस्त केली. मात्र, तोपर्यंत त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोहोचला होता.

पवारांनी असं बोलायला नको होतं

आम्ही तरुणांपर्यंत एक अॅप पोहोचवणार आहोत. त्यावर आम्ही तरुणांकडून जाहीरनामा मागवणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. बारामतीची चर्चा जास्त आहे, बारामतीत बदल होणार आहे. सुप्रिया सुळेंचा पराभव होणार असून सुनेत्रा पवारांचा नक्कीच विजय होणार आहे. शरद पवारांनी मन दुखवणारे वक्तव्य केले आहे. शरद पवारांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं शेलार यांनी याच पत्रकार परिषदेत म्हटलंय.

किती खोटं बोलणार?

दरम्यान, शेलार यांनी आजही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. गेले दोन- चार वर्ष उद्धव ठाकरे बोलत होते माझे आणि अमित शाह यांचे बोलणे झाले होते. आता ते फडणवीस यांच्यासोबत बोलणं झाल्याचा नवीन दावा करत आहेत. वर्षानुवर्षे उद्धव ठाकरे यांचे दावे बदलत आहेत. एक खोटं लपविण्यासाठी उद्धव ठाकरे आणखी किती खोटं बोलणार आहेत? अमित शहा यांनी सांगितले की, शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचे मनातलं चांदणं उद्धव ठाकरे यांचे समोर होते, असा दावा त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.