AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिय उदयभाऊ… आता तुम्ही फुटून उपमुख्यमंत्री… सुषमा अंधारे यांची खरमरीत पोस्ट, सामंतांना टोले

Sushma Andhare vs Uday Samant : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या असा दावा केला आहे. याला आता अंधारे यांनी उत्तर दिले आहे.

प्रिय उदयभाऊ... आता तुम्ही फुटून उपमुख्यमंत्री... सुषमा अंधारे यांची खरमरीत पोस्ट, सामंतांना टोले
Andhare vs Samant
| Updated on: Nov 22, 2025 | 10:25 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती असं सामंत यांनी म्हटलं होतं. याला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे असं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे अंधारे यांनी म्हटलं आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यात सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले… त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली…तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले. उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात.

होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली. दिल्ली महाराष्ट्र सदन च्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली. विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते.

उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं. असो हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे. ताजकलम… तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बर का…

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.