AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मिलिंद नार्वेकर आता किशोरी पेडणेकर, तेजस ठाकरेंच्या नावावर मुंबईच्या महापौरांचं ‘हॅटस ऑफ’ !

तेजस ठाकरे दैवी कथांवर जो काही अभ्यास करतात, जे काही संशोधन करतात हे खरंच हॅट्स ऑफ असल्याचंही महापौर किशोरी पेडणेकरांनी अधोरेखित केले.

आधी मिलिंद नार्वेकर आता किशोरी पेडणेकर, तेजस ठाकरेंच्या नावावर मुंबईच्या महापौरांचं 'हॅटस ऑफ' !
किशोरी पेडणेकर, महापौर,मुंबई
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 5:17 PM
Share

मुंबई : तेजस ठाकरे नावाप्रमाणेच तेजस आहेत, ते जे काही करतात त्याला हॅट्स ऑफ, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलंय. त्या मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. ठाकरे घराणे हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं चालतंय. उद्धव ठाकरेंच्या पोटी दोन सुपुत्र आहेत. तेजस ठाकरे दैवी कथांवर जो काही अभ्यास करतात, जे काही संशोधन करतात हे खरंच हॅट्स ऑफ असल्याचंही महापौर किशोरी पेडणेकरांनी अधोरेखित केले.

पण त्यांच्याबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील

तेजस ठाकरे राजकारणात येणार का असे म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच राजकारणात आहेत, पण त्यांच्याबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील. तेजस ठाकरे हे आक्रमक फलंदाज आहेत, ते करत असलेल्या कामामध्ये त्यांची आक्रमकता दिसते. पण तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असंही किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय.

उद्धव ठाकरे हे नेहमी नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेतात

उद्धव ठाकरे हे नेहमी नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेतात. आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांनीही फूल प्रूफ काम केलं. वयाच्या 16-17 व्या वर्षी येऊन सेनेच्या निवडणुका जिंकून आणल्यात. त्यामुळे ठाकरे घराण्यांमधलं असलेलं कर्तृत्व हे हळूवारपणे दिसत जातंय. आदित्य ठाकरे काम करत आहेत, म्हणून आमच्याकडे डबल हॉर्स पॉवर आहे, असंही त्या म्हणाल्या.

आम्हाला आता निवडणुकांची तयारी करावीच लागत नाही

आम्हाला आता निवडणुकांची तयारी करावीच लागत नाही. निवडणुका आम्ही कधीही हलक्यानं घेत नाही, निवडणुका हे नेहमी संग्राम असते, युद्ध असल्यामुळे तयारी असणारच आहे. त्यामुळे कोणीही अस्वस्थ होण्याची गरज नसल्याचंही मुंबईच्या महापौरांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपण प्रयत्नशील

आपण तर 24 तास देऊ शकतो, इतकी आपल्याकडे मॅन पावर आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे पाहिजे तेवढा लसीचा साठा उपलब्ध नाही. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. प्रत्येकाला नियम पाळायला सांगतोय, जास्तीत जास्त गर्दी होत असली तरी स्वतःला सावरा. थोडं अजूनही जपायला हवे, असं केंद्रातील आरोग्य मंत्रालयानंही सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्री कोणीही दबाव टाकला तरी लवकर सगळं काही उघडणार नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या  

आदित्य ठाकरेंकडे पालिकेची जबाबदारी, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार?; वाचा शिवसेनेत चाललंय काय?

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक

Tejas as the name Tejas Thackeray, hats off to for everything he does says Kishori Pednekar

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.