AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रकची धडक झाली, या अपघतामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू
AccidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 8:49 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रकची धडक झाली, या अपघतामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक 6 वर्षांचा मुलगा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात होते, खंडाळ्याकडे निघाले असतानाच वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या  श्रीरामपूर तालुक्यात खंडाळा गावाजवळ हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व जण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात होते, याचदरम्यान श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला, या अपघतामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.  खंडाळ्याकडे निघाले असतानाच वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं आहे. खंडाळा गावाच्या जवळ हा अपघात झाला आहे. तर एक 6 वर्षांचा मुलगा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळीच 5 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. ट्रक आणि कारची भीषण धडक झाली,  हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच  जाग्यावर 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर या अपघातामध्ये जखमी असलेल्या एका 6 वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

अपघाताचं कारण अस्पष्ट 

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? अपघाताचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकनेलं नाहीये, मात्र चालकाचं वहानावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे, या अपघातामध्ये 6 जणांनी आपला जीव गमावला आहे.

मृतांची नावं 

प्रशांत रमेश चव्हाण (वय 24)

संगीता अनिल चव्हाण (वय 40)

सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय 16)

सारिका अनिल चव्हाण (वय 30)

ऋत्वी अशोक चव्हाण (वय 3)

ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय 26)

जखमी

रुद्र अशोक चव्हाण (वय 6)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...