AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! मुंबईचा गड ठाकरेंनी तर ठाण्याचा गड भाजपने राखला? पदवीधर निवडणुकीचा निकाल काय?

मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वात मोठी बातमी! मुंबईचा गड ठाकरेंनी तर ठाण्याचा गड भाजपने राखला? पदवीधर निवडणुकीचा निकाल काय?
मुंबईचा गड ठाकरेंनी तर ठाण्याचा गड भाजपने राखला
| Updated on: Jul 01, 2024 | 6:06 PM
Share

मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अनिल परब यांना आतापर्यंत 44, 791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. ही आकडेवाडी पाहता अनिल परब यांना जवळपास 25 हजार मतांची लीड आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठी लीड मिळाल्याची माहिती मिळत आहे. निरंजन डावखरे यांना तब्बल 58 हजार मतांची लीड मिळाल्याची माहिती समोर येत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना केवळ 18 हजार मते मिळताना दिसत आहेत.  त्यामुळे मुंबईची पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात ठाकरे गटाला, तर ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपला यश मिळाल्याचं सध्याचं चित्र आहे. याबाबत आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या पसंतीच्या मतांची गणनी करण्यात आली त्यामध्ये 5800 मतांचा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र कुठल्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मते कुणासाठी निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपकडून शिवनाथ दराडे हे आहेत. तर ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर हे शर्यतीत आहेत. याशिवाय शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

चारही जागांचा निकाल आज जाहीर होतोय

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी 26 जूनला निवडणूक पार पडली होती. यानंतर आज या चार जागांचा निकाल समोर येत आहे. यासाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. या चारपैकी दोन जागांचा निकाल जवळपास निश्चित झालाय. आता मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक विभागीय मतदारसंघ यांच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

नेमकी लढत कुणाकुणामध्ये?

  • कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध रमेश कीर ( काँग्रेस)
  • मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब ( ठाकरे गट)
  • मुंबई शिक्षक मतदारसंघ – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (मविआ), सुभाष मोरे ( शिक्षक भारती)
  • नाशिक शिक्षक मतदारसंघ – किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट)

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “आतापर्यंतच्या मतमोजणी नुसार मुंबई पदवीधर मध्ये आमचे उमेदवार अनिल परब हे मोठ्या लीड वरती आहेत. जवळपास 25 हजार इतका मताधिक्य अनिल परब यांना पाहायला मिळते त्यामुळे इथला विजय निश्चित झालेला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात सुद्धा काँटे की टक्कर आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हे चित्र स्पष्ट होणं बाकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात सुद्धा आम्हाला विजयाचा विश्वास आहे. नाशिकच्या जागेबाबत फारसे अपडेट्स माझ्याकडे नाहीत. कोकण पदवीधर मध्ये आम्ही नक्कीच जिंकू असा विश्वास. मात्र त्या जागी जर आमचा उमेदवार असता तर आम्ही तो 100% जिंकला असता”, असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.