Ulhasnagar : शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडा, शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले जीवदान

नातेवाईकांनी नाझरीनला 18 एप्रिल रोजी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिच्या पोटाचं सिटीस्कॅन केलं असता गर्भाशयात कापडासारखं काहीतरी असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे 19 एप्रिलला तातडीने तिचं ऑपरेशन करण्यात आलं.

Ulhasnagar : शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडा, शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले जीवदान
शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:14 AM

उल्हासनगर : उत्तर प्रदेशात प्रसुतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेच्या पोटात कॉटनचा कपडा राहिला होता. हा कपडा उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑपरेशन (Operation) करून काढला आणि या महिलेला जीवनदान दिलं. नाझरीन खान (25) या गर्भवती महिलेची ऑक्टोबर 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील फतेपूरमध्ये प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यात तिच्या बाळाचा मृत्यू झाला. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कॉटनचा कपडा म्हणजेच मॉप हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेच्या पोटातच राहिला. त्यामुळं गर्भाशयाभोवती पस निर्माण होऊन नाझरीनला असह्य वेदना (Pain) होत होत्या. काही दिवसांपूर्वी नाझरीन ही उल्हासनगरात तिच्या नातेवाईकांकडे आली असताना तिला जीवघेण्या वेदना सुरू झाल्या. (A cotton cloth remained in the womans uterus during the surgery in ulhasnagar)

शासकीय रुग्णालयातील दिले महिलेला जीवदान

नातेवाईकांनी नाझरीनला 18 एप्रिल रोजी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिच्या पोटाचं सिटीस्कॅन केलं असता गर्भाशयात कापडासारखं काहीतरी असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे 19 एप्रिलला तातडीने तिचं ऑपरेशन करण्यात आलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत दोडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नंदा सावंत, डॉ. नम्रता कुलकर्णी, डॉ. कासम दलवाई, डॉ. तहसिन फातिमा, डॉ. राजेश म्हस्के, नर्स छाया घोष, चंदनशिवे या टीमने तब्बल 3 तास ऑपरेशन करत नाझरीनच्या गर्भाशयातील कपडा काढला.

नाझरीनची प्रकृती उत्तम

या ऑपरेशननंतर नाझरीनची प्रकृती उत्तम आहे. ही शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवल्याबद्दल तिचा पती इस्माईल खान यांनी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सरकारी रुग्णालय म्हटलं की, तिथं उपचार नीट मिळत नाहीत, डॉक्टर चांगले नसतात, कुणी लक्ष देत नाही, असे समज लोकांच्या मनात असतात. मात्र नाझरीनच्या बाबतीत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाने दाखवलेली तत्परता आणि तिचा वाचवलेला जीव यानंतर हे गैरसमज मोडीत निघाले आहेत. (A cotton cloth remained in the womans uterus during the surgery in ulhasnagar)

इतर बातम्या

Abu Salem : अबू सालेम प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले !

Thane Death Sentence : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या प्रकरणी पोक्सो न्यायालयाकडून आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.