शहापूरमध्ये अपघातात कुटुंब उद्ध्वस्त, आई-वडीलांचा मृत्यू, 8 वर्षीय जान्हवीच्या पायाचा तुकडा

शहापूर-डोलखांब रस्त्यावर पांढरीचा पाडा येथे बोलेरो गाडीने एका टूव्हिलरला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात एक कातकरी समाजाचे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले. निभळपाडा येथील कैलास मुकणे हे आपली 8 वर्षीय मुलगी जान्हवी आणि पत्नी कमल मुकणे सोबत दुचाकीवर होते.

शहापूरमध्ये अपघातात कुटुंब उद्ध्वस्त, आई-वडीलांचा मृत्यू, 8 वर्षीय जान्हवीच्या पायाचा तुकडा
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 1:16 PM

सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर : शहापूर-डोलखांब रस्त्यावर पांढरीचा पाडा येथे बोलेरो गाडीने एका टूव्हिलरला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात एक कातकरी समाजाचे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले. निभळपाडा येथील कैलास मुकणे हे आपली 8 वर्षीय मुलगी जान्हवी आणि पत्नी कमल मुकणे सोबत दुचाकीवर होते. ते सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास टेंभुर्ली येथून घरी परतत होते. तेव्हा डोळखांबकडून शेणव्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो गाडीने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिल्यानं अपघात झाला.

या अपघातात कैलास मुकणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी कमल मुकणे यांनाही गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मुंबई येथील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचाही उपचारा दरम्यानच मृत्यू झाला. त्यांच्या 8 वर्षीय मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झालीय. तिचा पाय गाडीखाली चिरडला गेल्यानं पायाचं हाड मोडून मांसाबाहेर आलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना हा पाय कापून काढवा लागला. जान्हवीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

“अपघाताने 8 वर्षीय मुलगी अनाथ, एक पायही कापून काढावा लागला”

आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या 8 वर्षीय जान्हवीचा एक पाय कट झाल्यानं या मुलीला मदतीची गरज आहे. या प्रकरणी कैलास मुकणे यांचे भाऊ तुकाराम मुकणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. बोलेरो जीप क्र. MH 06 AZ 6568 या गाडीचालकावर भारतीय दंड विधान संहिता कलम 304(अ), 279, 337, 338 तसेच मोटरसायकल वाहन कायदा कलम 184, 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोलेरो जीपचा चालक मद्यधुंद असल्याचा आरोप, नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

बोलेरो जीपचे चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच चालकाचं नियंत्रण सुटून त्याने मुकणे यांच्या गाडीला धडक दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाचे नातेवाईक करत आहेत. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणीही होत आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील मृताच्या पत्नी कमल मुकणे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं 8 वर्षीय जान्हवी अनाथ झाली आहे.

अपघातात तिचा पाय निकामी झाल्याने कापून काढवा लागला. त्यामुळे या अपघाताने तिला अपंगत्व आलंय. तिच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. तिच्या नातेवाईकांकडून संबंधित वाहन चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा :

श्रीमंतीचा माज, दारु पिऊन अलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, परळीतील बड्या नेत्याच्या मुलाचं संतापजनक कृत्य

भयान आणि भीषण, बुलडाण्यात खरतनाक अपघात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी

Raigad Accident | मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसला अपघात, एकजण गंभीर

व्हिडीओ पाहा :

Accident on Shahapur Dolkhamb road mother father died daughter lost one leg in Thane

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.