Kalyan Farmer Beatened : शिवसेनेच्या माजी नगरसेवकानंतर पिडीत शेतकरी कुटुंबावरही गुन्हा दाखल
चालक निलेश चोचे यांचा आरोप आहे की, 3 तारखेला साडे आठ वाजण्याच्या सुमारास रमेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांच्या कामाच्या निमित्ताने मोकाशी पाडा येथे गेले असता देवीदास, प्रशांत आणि एकनाथ मोकाशी यांनी चोचे चालवित असलेल्या गाडीवर विटा फेकून त्यांच्या ताब्यातील महिंद्र स्कॉर्पिओ गाडी एमएच-05,सीएम 6201 याची काच तोडून नुकसान केले. तसेच चोचे यांना शिवीगाळ करुन विटा फेकून मारहाण केली.

कल्याण : जमीन लाटल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांच्यासह पंधरा जणांच्या विरोधात मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रमेश म्हात्रे यांच्या चालकाच्या फिर्यादीवरुन बुधवारी शेतकरी कुटुंबातील (Farmer Family) तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. दहिसर मोकाशी पाडा येथील एकनाथ मोकाशी यांच्या कुटुंबातील काही लोकांना 3 फेब्रुवारीच्या रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा आरोप केडीएमसीचे शिवसेनेचे माजी नगरसेक म्हात्रे यांच्यासह पंधरा जणांच्या विरोधात होता. (After the former Shiv Sena corporator, a case was also filed against the victim’s family in kalyan)
म्हात्रेंच्या चालकावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
चालक निलेश चोचे यांचा आरोप आहे की, 3 तारखेला साडे आठ वाजण्याच्या सुमारास रमेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांच्या कामाच्या निमित्ताने मोकाशी पाडा येथे गेले असता देवीदास, प्रशांत आणि एकनाथ मोकाशी यांनी चोचे चालवित असलेल्या गाडीवर विटा फेकून त्यांच्या ताब्यातील महिंद्र स्कॉर्पिओ गाडी एमएच-05,सीएम 6201 याची काच तोडून नुकसान केले. तसेच चोचे यांना शिवीगाळ करुन विटा फेकून मारहाण केली. तसेच रमेश म्हात्रे यांचे खाजगी अंगरक्षकावरही दगडफेक केली. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
मोकाशी यांची जमीन घेण्यासाठी म्हात्रे दबाव टाकत असल्याचा आरोप
मोकाशी यांचा आरोप होता की, त्यांची तीन गावात 285 एकर जमीन आहे. ही जमीन घेण्यासाठी म्हात्रे हे त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. मोकाशी कुटुंबियांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शेतकऱ्यांसह डायघर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी अखेर रमेश म्हात्रेसह वैभव पाटील, सचिन पाटीलसह इतर 15 जणांविरोधात भादवी 326, 143, 147, 148, 149, 504, 506, 34 या प्रमाणो गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्रीच रमेश म्हात्रे यांचे स्कार्पिओ गाडीचे चालक निलेश चोचे यांच्या फिर्यादीवरुन शेतकरी देवीदास मोकाशी, प्रशांत मोकाशी, एकनाथ मोकाशी यांच्या विरोधात भादवी 324, 427, 504, 34 प्रमाणो गुन्हा दाखल केला. (After the former Shiv Sena corporator, a case was also filed against the victim’s family in kalyan)
इतर बातम्या
pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या
