बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रस्त्यावर 10 फूट लांबीचे खड्डे, वाहन चालकांची कसरत

बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर तब्बल 10-10 फूट लांबीचे खड्डे पडले आहेत.

बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रस्त्यावर 10 फूट लांबीचे खड्डे, वाहन चालकांची कसरत
बदलापूर-मुरबाड रोडची चाळण
निनाद करमरकर

| Edited By: Akshay Adhav

Jul 30, 2021 | 3:13 PM

ठाणे : बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर तब्बल 10-10 फूट लांबीचे खड्डे पडलेबदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर तब्बल 10-10 फूट लांबीचे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांना इथून गाड्या चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतेय. (Badlapur Murbad Road potholes)

Badlapur Murbad Road potholes

रस्त्याची झालेली दुरावस्था

बदलापूर शहरातून मुळगाव आणि बारवी धरणामार्गे मुरबाडला जाणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरून मुरबाडसह माळशेज घाट, शिर्डी, अहमदनगर त्याचप्रमाणे शहापूर आणि नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी मोठी वाहतूक होत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीने या रस्त्याकडे लक्षच दिलेलं नाही.

Badlapur Murbad Road potholes

बदलापूर-मुरबाड रोडची चाळण

त्यामुळे आधीच खड्डे आणि त्यात पावसाचं जमा झालेलं पाणी, यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे. चारचाकी गाड्यांचे चिमटे तुटणे, गाड्या खड्ड्यात बसून बंद पडणे, असे प्रकार तर या रस्त्यावर दररोज होत असतात. विशेषत: दुचाकी चालकांचे या रस्त्यावरून जाताना प्रचंड हाल होत असतात. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जातेय.

Badlapur Murbad Road potholes

रस्यावर खड्डेच खड्डे

(Badlapur Murbad Road potholes)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें