AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प सात टप्प्यातील आहे. त्यापैकी दुर्गाडी ते टिटवाळा हा 17 किलोमीटर टप्प्यातील काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील आटाळी आंबिवली दरम्यान 840 जणांची घरे बाधित झाली होती.

Kalyan : रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती
रिंग रोड रस्ता बाधितांचे बीएसयुपी प्रकल्पात पुनर्वसन करणार
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 11:47 PM
Share

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात रिंग रोड (Ring Road) प्रकल्पामध्ये अनेक घरं बाधित झाले असून त्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली जात होती. याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी बीएसयुपी प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून रिंग रोड रस्ता बाधितांनाही बीएसयुपी (BSUP) प्रकल्पात पुनर्वसन करणार असल्याचं सांगितलं. याबाबत माहिती देताना खासदार शिंदे यांनी रिंग रोड रस्त्यामध्ये जे बाधित झाले आहेत. त्यांचं बीएसयुपी प्रकल्पातील घरामध्ये पुनर्वसन करणार आहोत. या आधी बीएसयुपीमध्ये जी तांत्रिक अडचण होती, त्या तांत्रिक अडचणी पालकमंत्री यांच्या बैठकीत सोडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही घरे महापालिका थेट लाभार्थ्यांना येईल. आधी लाभार्थ्यांना घरे दिली जातील त्यानंतर जे प्रकल्पात बाधित झाले आहेत त्यांना या बीएसयूपी प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करू अस खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. (BSUP will rehabilitate those affected by the Ring Road project at the project)

रिंग रोड प्रकल्पात 840 घरे बाधित झाली

कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प सात टप्प्यातील आहे. त्यापैकी दुर्गाडी ते टिटवाळा हा 17 किलोमीटर टप्प्यातील काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील आटाळी आंबिवली दरम्यान 840 जणांची घरे बाधित झाली होती. बाधितांनी यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागितली. मात्र त्यांचा प्रश्न सुटला नाही म्हणून अखेरीस त्यांनी 10 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ 19 जानेवारी 3 उपोषणकर्त्यांनी मुंडन करुन प्रशासनाचा निषेध केला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी 72 तासांचा मेगाब्लॉक घेणार

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यापैकी पाचव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्यावरून रेल्वे गाड्या धावणार आहेत. सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या 72 तासाच्या मेगाब्लॉक घेण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. मध्य रेल्वेवरील मागील 14 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या पाचव्या मार्गीकेचे काम पूर्ण झाले असून ही पाचवी मार्गिका कार्यान्वित होणार असल्याने प्रवाशांना विनाखंड प्रवास करता येणार आहे. हा पहिला चरण पूर्ण झाला असून 4 ते  6 फेब्रुवारी दरम्यानच्या 72 तासाच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्याचा दिवस रेल्वेसाठी आणि प्रवाशासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. (BSUP will rehabilitate those affected by the Ring Road project at the project)

इतर बातम्या

Thane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल

बिटींग द रिट्रीट मध्ये 70 वर्षांपासून वाजणाऱ्या ‘त्या’ गाण्याची गोष्ट जे यंदा वाजविले जाणार नाही..

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.