काँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस उद्या रविवार 1 ऑगस्टपासून राज्यभर 'व्यर्थ न हो बलिदान' हे अभियान राबवणार आहे. पुण्यातील टिळक वाड्यापासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. (Celebration of 75 years of independence: congress to start vyarth na ho balidan campaign)

काँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान; रविवारपासून टिळक वाड्यातून सुरुवात
nana patole
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 6:20 PM

ठाणे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस उद्या रविवार 1 ऑगस्टपासून राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान राबवणार आहे. पुण्यातील टिळक वाड्यापासून या अभियानाची सुरुवात होणार असून 15 ऑगस्टपर्यंत आणि वर्षभर हे अभियान राबवलं जाणार आहे. (Celebration of 75 years of independence: congress to start vyarth na ho balidan campaign)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे योगदान नव्या पिढीसमोर मांडले जाणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली विविध माध्यमातून ब्रिटीश सरकारला जेरीस आणले. या संघर्षात हजारो लोकांनी बलिदान दिले, अनेकांना इंग्रज शासनाचे अनन्वीत जुलुम, अत्याचार सहन करावे लागले, लाठ्या काठ्या अंगावर घेतल्या, हजारोंना तुरुंगात डांबले गेले पण स्वातंत्र्यासाठी कुठलीही तडजोड केली नाही. स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने भरीव कामगिरी केली म्हणूनच जगात देश आज ताठ मानने उभा आहे परंतु काही लोक काँग्रेस, गांधी, नेहरु कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करत आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे योगदान नाकारता येणार नाही, असंही त्यांना सांगितलं.

काँग्रेसच्या जुन्या नेत्यांच्या वारसांना बोलावणार

या अभियानाची सुरुवात करताना पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या घराण्यांच्या वारसांना बोलावले जाणार आहे. राज्यातील 15 हजारांपेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांच्या भागात गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक अशा महत्वाच्या, ऐतिहासिक ठिकाणी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

कुठे कोणता कार्यक्रम?

पहिल्या टप्यात 1 तारखेला पुण्यात कार्यक्रम होईल त्यानंतर 7 ऑगस्टला सकाळी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करुन स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाणार आहे.  स्वातंत्र्यचळवळीत चिमठाणा जिल्हा धुळे येथे ब्रिटिशांचा खजिना लुटला होता त्या जंगलात दुपारी 4 वाजता कार्यक्रम होणार आहे, मशाल मोर्चा काढला जाईल. शिरिषकुमार मेहता या 14 वर्षांच्या तरुणाने स्वातंत्र्यासाठी इंग्रजांचा गोळ्या झेलल्या त्याच्या स्मरणार्थ नंदुरबार येथे 8 ऑगस्टला सकाळी एक कार्यक्रम होईल. त्यानंतर नाशिक येथे दुपारी 4 वाजता थोर क्रांतीकारक अनंत कान्हेरे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होईल आणि 9 ऑगस्टला मुंबईतील गवालिया टँक येथे एक कार्यक्रम संपन्न होत आहे. या अभियानासाठी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व विनायक देशमुख यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी आहे तर उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी पुढाकार घेतला आहे. (Celebration of 75 years of independence: congress to start vyarth na ho balidan campaign)

संबंधित बातम्या:

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा

बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल

मंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा

(Celebration of 75 years of independence: congress to start vyarth na ho balidan campaign)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.