AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामगार उपायुक्तांचे आदेश ठेकेदाराकडून पायदळी, कोविडमध्ये सेवा बजावणार्‍या कामगारांना कामावरुन काढले

कोविडच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणार्‍या फायलेरिया विभागातील सुमारे 14 कामगारांना एका महिला ठेकेदाराने घरी बसविले आहे. कामगार उपायुक्तांनी आदेश देऊनही या कामगारांना कामावर न घेतल्यामुळे सुट्टी असतानाही या कामगारांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली.

कामगार उपायुक्तांचे आदेश ठेकेदाराकडून पायदळी, कोविडमध्ये सेवा बजावणार्‍या कामगारांना कामावरुन काढले
कामगार उपायुक्तांचे आदेश ठेकेदाराकडून पायदळी, कोविडमध्ये सेवा बजावणार्‍या कामगारांना कामावरुन काढले
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:35 PM
Share

ठाणे : कोविडच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणार्‍या फायलेरिया विभागातील सुमारे 14 कामगारांना एका महिला ठेकेदाराने घरी बसविले आहे. कामगार उपायुक्तांनी आदेश देऊनही या कामगारांना कामावर न घेतल्यामुळे सुट्टी असतानाही या कामगारांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली.

कामगार उपायुक्तांचे आदेश ठेकेदाराकडून पायदळी

ठाणे महानगर पालिकेच्या फायलेरिया विभागाने शहरात औषध फवारणीचा ठेका शुभम महिला विकास मंडळाला दिला आहे. या ठेकेदाराकडे गेल्या आठ वर्षांपासून 21 कामगार काम करीत होते. त्यापैकी फक्त सात जणांना शुभम महिला विकास मंडळाच्या प्रोपायटर शिला पाटणकर यांनी 29 मे 2021 पासून कामावर घेतले असून उर्वरित 14 जणांना कामावरुन काढून टाकले आहे. या कामगारांनी या प्रकरणी कामगार उपायुक्तांकडे दाद मागितली होती. त्यावेळी कामगार उपायुक्तांनी 21 जून रोजी कामगारांना कामावर परत घेण्यासाठीचे लेखी आदेश दिलेले आहेत.

कोविडमध्ये सेवा बजावणार्‍या कामगारांना कामावरुन काढले

मात्र, त्यानंतरही शुभम महिला विकास मंडळाने या कामगारांना कामावर घेतलेले नाही. विशेष म्हणजे, या संदर्भात 1 ऑक्टोबर 2021 रोजी पालिका मुख्यालयात एक बैठक घेऊन घनकचरा उपायुक्त हळदेकर यांच्यासमोरच शुभम महिला विकास मंडळाच्या वतीने 4 ऑक्टोबरपासून कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे मान्य केले होते. मात्र, 26 दिवस उलटून गेल्यानंतरही कामगारांना कामावर घेतलेले नाही. त्यामुळे या कामगारांनी शनिवारी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.

यावेळी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे उपाध्यक्ष महेंद्र हिवराळे यांनी सांगितले की, शुभम महिला विकास मंडळाकडे काम करणारे हे 14 कामगारांनी आपले अधिकार ठेकेदाराकडे मागितल्यामुळे त्यांना कामावरुन कमी करण्यात आलेले आहे. या ठेकेदाराने कामगारांना त्यांची देणी दिलेली नाहीत. शिवाय, त्यांना कामावर घेण्यासाठी आदेश देऊनही त्या आदेशांचा भंग केलेला आहे.

14 पैकी अर्धे कामगार हे दलित प्रवर्गातील असून त्यांच्या रोजगाराच्या अधिकारावरही ठेकेदाराने गदा आणलेली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी युनियनने केली असून त्यावर कार्यवाही न झाल्यास आम्ही सर्व बेमुदत उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा :

कोरोनाने काय परिस्थिती ओढावलीय, अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही, सुन्न करणारी घटना

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.