कोरोनाने काय परिस्थिती ओढावलीय, अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही, सुन्न करणारी घटना

गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांच्या अस्थी स्मशानभुमीत तशाच पडून राहिल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अस्थी घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत कोणीच आले नसल्यामुळे या अस्थींचे आता काय करायचे असा प्रश्न महापालिका कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

कोरोनाने काय परिस्थिती ओढावलीय, अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही, सुन्न करणारी घटना
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अस्थी घेऊन जायला नातेवाईक आले नाहीत पण स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मात्र अस्थी जतन करुन ठेवल्या आहेत.
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 8:54 AM

ठाणे : गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांच्या अस्थी स्मशानभुमीत तशाच पडून राहिल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अस्थी घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत कोणीच आले नसल्यामुळे या अस्थींचे आता काय करायचे असा प्रश्न महापालिका कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

अस्थी घेऊन जायलाही नातेवाईक येत नाही

कोरोनाने अनेक सामाजिक समस्या निर्माण केल्या आहेत परंतु एका विचित्र सामाजिक समस्येवर तोडगा कसा काढायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले की मृत व्यक्तीचे नातेवाईक दुसर्‍या दिवशी स्मशानभुमीतून अस्थी गोळा करतात आणि नंतर त्याचे विधीपूर्वक विसर्जन करत असतात. निधन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी विसर्जनाला फारच महत्त्व आहे. परंतु गेल्या दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांच्या अस्थी स्मशानभुमीत तशाच पडून राहिल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अस्थी घेऊन जाण्यासाठी आजपर्यंत कोणीच आले नसल्यामुळे या अस्थींचे आता काय करायचे असा प्रश्न महापालिका कर्मचार्‍यांपुढे उभा राहिला आहे.

कोरोनाने मृत्यू, मरणानंतरही परवड

कोरोनाच्या पहिल्या लाटेची नागरिकांनी मोठीच धास्ती घेतली होती. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाहीत. सरकारी अथवा महापालिका कर्मचारीच ते मृतदेह स्मशानभुमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत असतात. मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराच्या वेळी दूरवरच उभे केले जात होते. काही प्रसंगी तर अशा मृत व्यक्तींचे नातेवाईकही स्मशानभुमीत आलेले नाहीत. भाईंदर पश्चिम येथील स्मशानभुमीत असे अनेक कोरोनाचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले आहेत. त्यामुळे त्या मृतदेहांच्या अस्थी नेण्यासाठी कोणीही आलेले नाही. कोरोनात संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याचे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या अस्थींवर दावा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.

स्मशानभुमीतील कर्मचार्‍यांकडून अस्थींचं जतन

अशा दावा न करण्यात आलेल्या अस्थी स्मशानभुमीतील कर्मचार्‍यांनी व्यवस्थित जतन करुन ठेवल्या आहेत. या अस्थी कोणाच्या आहेत त्या मृतदेहाच्या नावाचाही अस्थीकलशावर उल्लेख करण्यात आला आहे. परंतू आजपर्यंत त्या नेण्यासाठी कोणीही आलेले नाही. काही अस्थी तर गेल्यावर्षी मे महिन्यातील आहेत तर काहींच्या नावाचा उल्लेखही आता पुसट होऊ लागला आहे. काही वेळा मृतदेहासोबत असलेल्या व्यक्तींनी अस्थींचे परस्पर विसर्जन करायला सांगितल्यामुळे त्यांचे विसर्जनही कर्मचार्‍यांनी केले आहे. परंतू ज्या अस्थींवर कोणी दावाच केला नाही त्यांचा आता काय करायचे असा प्रश्न या कर्मचार्‍यांपुढे उभा ठाकला आहे.

हे ही वाचा :

आर्यन खान प्रकरणात हॅकर मनीष भंगाळेंची एन्ट्री, धक्कादायक गौप्यस्फोट करत पाच लाखांच्या ऑफरचा दावा

‘आर्यन खान प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी मला पाच लाखांची ऑफर’, हॅकर मनिष भंगाळेचा खळबळजनक दावा

समीर वानखेडेंची तपास अधिकारी म्हणून उचलबांगडी होणार? NCB चे वरिष्ठ म्हणाले, तपास पुढे जाऊ द्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.