जागा वाटपावरून कुरबुरी..शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर खलबतं, राज्यात मोठी घडामोड? ठाण्यातून ती मोठी अपडेट काय?

Eknath Shinde Shivsena MLA Meeting: महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली असली तरी जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. या कुरबुरीअगोदर शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर ठाण्यात खलबतं सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठकी झाली. काय आहे अपडेट?

जागा वाटपावरून कुरबुरी..शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर खलबतं, राज्यात मोठी घडामोड? ठाण्यातून ती मोठी अपडेट काय?
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांची बैठक
Image Credit source: फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Dec 13, 2025 | 9:14 AM

Shinde Sena MLA Meeting At Thane: महापालिका निवडणुकीसाठी महायुती ठरली असली तरी जागा वाटपाचा तिढा होण्याची दाट शक्यता आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबईत भाजपला अधिक जागा हव्यात आहेत. तर शिंदे सेना पण अनेक जागांसाठी आग्रही आहे. महापौर आणि इतर पद कुणाला मिळेल हे ठरलेलं नाही. पण त्यापूर्वी ठाण्यात शिंदे सेनेच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला झाडून सर्व आमदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती.

ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खलबतं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा केली. विकास कामात कुठेही अडथळा येणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांचे आमदारांना आश्वासन दिलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास कामांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही, यावर देखील चर्चा झाली. ठाकरेंच्या शिवसेनेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर द्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

महायुतीला गालबोट नको

पालिका निवडणुका या युती म्हणून लढायच्या आहेत, त्यामुळे महायुतीला गालबोट लागेल असे कुठेही वक्तव्य नको अशा सूचनाही यावेळी आमदारांना देण्यात आल्या. तर एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत आरे ला कारे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लवकरच महामंडळाचं वाटप

महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप व्हावं अशी इच्छा आमदारांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरापासून महामंडळाचं जागा वाटप झालेले नाही. ज्यांना खातेवाटपात संधी मिळाली नाही, अशा आमदारांचे महामंडळावर पुनर्वसन करण्याची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत आहे. लवकरात लवकर महामंडळाचे देखील वाटप होईल असा आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.