अंबरनाथ रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ, अचानक आग लागली आणि…, नेमकं काय घडलं?

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. शेकडो प्रवासी आपापल्या गंतव्यस्थळी जात होते. प्रत्येकजण आपल्याला हव्या असणाऱ्या रेल्वे गाडीने जात होते. काहीजण रेल्वे गाडीची वाट पाहत होते. या दरम्यान अचानक आगीची घटना घडली आणि एक तास खोळंबा झाला.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ, अचानक आग लागली आणि..., नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 4:57 PM

ठाणे : अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात मोठी आग लागल्याची घटना समोर आलेली. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आग लागली त्या परिसरात धुराचे मोठे लोळ उसळले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना धडकी बरली. संबंधित घटना नेमकी का घडली? ते सुरुवातीला समजत नव्हते. आग लागल्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागली. थोड्यावेळाने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

आगीच्या घटनेमुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग बंद झाला. हा मध्य रेल्वेला मोठा फटका आहे. कारण ही वेळ गर्दीची असते. लाखो प्रवाशी आपापल्या कार्यालयांतून घरी जायला निघतात. अशावेळी रेल्वे वाहतूक संथ गतीने चालत असेल तर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. संबंधित घटनेमुळे रेल्वे स्थानकावर तासभर रेल्वे गाडी उभी होती. प्रवाशांची प्रचंड गर्दी फलाटावर बघायला मिळाली.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ रेल्वे स्थानकात कर्जत दिशेला रेल्वे रुळाच्या बाजूलाच रेल्वेची इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्याची केबिन होती. या केबिनमध्ये असलेल्या वायर्सला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघू लागले. त्यामुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग बंद करण्याची वेळ रेल्वेवर आली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग तासाभर बंदच होता. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक मेल एक्सप्रेस उभी करून ठेवण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.