AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरिनामाचा जयघोष सुरू होता, अचानक गाडी धडकली अन्… मध्यरात्री कसा घडला अपघात?; भक्ताने सांगितला थरार!

पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस ट्रॅक्टरला आदळल्याने दरीत कोसळून हा अपघात झाला. या बसमध्ये तेव्हा 54 प्रवासी होते. अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरिनामाचा जयघोष सुरू होता, अचानक गाडी धडकली अन्... मध्यरात्री कसा घडला अपघात?; भक्ताने सांगितला थरार!
dayanand bhoirImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2024 | 1:31 PM
Share

पंढरपूरच्या वारीला जात असताना भक्तांच्या बसला पनवेल येथे मध्यरात्री अपघात झाला. यात तीन वारकऱ्यांसह दोघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण ठाणे-डोंबिवली गावातील आहेत. सर्वजण वारकरी होते. या गावातील एकूण 200 जणांचा ताफा पंढरपूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. त्यामुळे येथील गावांवर शोककळा पसरली आहे. मध्यरात्रीच्यावेळी हा अपघात कसा झाला? याची माहिती एका भक्ताने दिली आहे. अंगावर शहारे आणणारा आणि थरकाप उडवणारा हा अनुभव आहे.

अपघातातून वाचलेल्या दयानंद भोईर या भक्ताने अपघाताचा थरारा सांगितला. दयानंद हे घेसर गावातील रहिवशी आहेत. आम्ही रात्री 11 वाजता पंढरपूरच्या दिशेने निघालो होतो. एकूण सहा बसेस केल्या होत्या. त्यात सुमारे 200 भाविक होते. आम्ही हरिनामाचा जयघोष करतच चाललो होतो. एक्सप्रेस हायवेवर गेलो. बस स्पीडमध्ये होती. जयघोष सुरू होता. आम्हालाही कळलं नाही काय झालं. अशी धडक बसली की गाडी हलली. त्यानंतर आम्ही जयघोष बंद केला. त्यानंतर काय झालं कळलं नाही, असं दयानंद भोईर यांनी सांगितलं.

काचा फोडून बाहेर आलो

आम्ही काचा फोडून एक एक करून बाहेर आलो. आमच्या मागे बस होत्या. त्यातील लोक धावत आले आणि आम्हाला बाहेर काढलं. त्यानंतर रग्णवाहिकांना फोन केला. रुग्णवाहिकाही घटनास्थळी तातडीने आल्या. आम्हाला रुग्णालयात नेले. आमच्या गावातील 200 लोक होते. आमच्या गावातील सर्व वारकरी आहेत. त्यातील काही नॉर्मल जखमी आहेत. त्यांना रुग्णालयातून 24 तासात सोडणार आहेत, असं दयानंद म्हणाले. आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो. हे आमचं 25वं वर्ष होतं. माऊलीचं दर्शन घेऊन मोठा उत्सव करायचा होता. रिंगण घालायचं होतं. पण आमचा नाईलाज झाला, असंही त्यांनी सांगितलं.

ट्रकचे दोन तुकडे

कल्याण डोंबिवली आणि ठाणे ग्रामीणमधून वेगवेगळया गावातून विठुरायाच्या दर्शनासाठी सहा बस हरिनामाच्या जयघोष करत मोठ्या उत्साहात निघाल्या होत्या. मात्र पनवेलजवळ काळाने घाला घातला. बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन बसमधील तीन वारकऱ्यांसह ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला. बस मुंबई ते पंढरपूरकडे जात असताना भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून शंभर फूट घासत नेली. त्यामुळे ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला.

मृत आणि जखमींची नावे

या अपघातात ट्रॅक्टरमधील तरवेज सलाउद्दीन अहमद आणि एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरला ठोकर मारून बसने डाव्या बाजूची रेलिंग तोडली. त्यानंतर बस 10 ते 15 फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात बसमधील गुरुनाथ बाबू पाटील वय 70 वर्षे, रामदास नारायण मुकादम वय 70 वर्षे आणि हंसाबाई हरी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

तर, बाबुराव धर्मा भोईर वय 70 वर्षे, मामा पोगया भोईर वय 70 वर्षे, गणपत जोग्या मुकादम वय 70 वर्षे, संजय बापूराव पाटील वय 63 वर्षे, सुमन साळुंखे वय 60 वर्ष आदींना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच 38 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे. 5 प्रवासी उपचार न घेता सुखरूप आहेत.

वाहतूक सुरळीत

या अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, सिडको अग्नीशमन दल, कळंबोली -खांदेश्वर-पनवेल शहर, पनवेल तालुका पोलीस, नवी मुंबई वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णालयाचे ॲम्बुलन्स, आणि पनवेल परिसरातील ॲम्बुलन्स चालकाने घटनास्थळी मदत कार्य केले.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.