चाकू दाखवूनही हिंमतबाज महिलेची चोराशी झुंज, अख्खी टोळी गजाआड; धावत्या एक्सप्रेसमध्ये थरार!

काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये प्रचंड थरार पाहायला मिळाला. कर्जत येथे गाडीत चार चोरांची टोळी शिरली. त्यानंतर या चोरांनी प्रवाशांचे सामान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांनी चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली.

चाकू दाखवूनही हिंमतबाज महिलेची चोराशी झुंज, अख्खी टोळी गजाआड; धावत्या एक्सप्रेसमध्ये थरार!
चाकू दाखवूनही हिंमतबाज महिलेची चोराशी झुंज, अख्खी टोळी गजाआड; धावत्या एक्सप्रेसमध्ये थरार!
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 4:29 PM

कल्याण: काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये (kakinada bhavnagar express) प्रचंड थरार पाहायला मिळाला. कर्जत येथे गाडीत चार चोरांची टोळी शिरली. त्यानंतर या चोरांनी प्रवाशांचे सामान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांनी चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. यावेळी चोराने एका महिलेची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने बॅग देण्यास नकार दिला आणि या चोरांशी झुंज दिली. चोरांनी महिलेला चाकू दाखवला. पण ही हिंमतबाज महिला तरीही चोरांना बधली नाही. तिने या चोरांना प्रतिकार केला. मात्र, चोरांनी या महिलेकडून बळाच्या जोरावर बॅग हिसकावून घेतली. तेवढ्यात एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांना (railway police) फोन केला. पोलिसांनीही तात्काळ येऊन या पाचही चोरांना अटक केली आणि या पाचही चोरांची (thieves) पाच दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

27 जानेवारी रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. काकीनाडा भावनगर एक्सप्रेस कर्जत स्थानकाजवळ आली असता बोगीत काही चोरांनी प्रवेश केला. या चोरांनी प्रवाशांचे सामान लुटण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी प्रवाशांनी चोर चोर अशी ओरड सुरू केल्यानंतर हे चोर पुढच्या डब्यात आले. या डब्यात वसईत राहणाऱ्या जया पिसेही त्यांच्या मुलीसह प्रवास करत होत्या. प्रवाशांचा आवाज कानावर आल्यावर जया यांनी त्यांच्या बॅगा जवळ घेतल्या. यावेळी जया यांच्या हातात बॅगा पाहून चोरांनी त्यांच्याकडून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. जयाने त्याला प्रतिकार केला. त्यानंतर एका चोराने चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एक सतर्क नागरिकाने चक्क 100 नंबरवरुन पोलिसांना फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने त्वरित या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या हवाली केले.

अल्पवयीन मुलाचा समावेश

हे पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा या परिसरात राहणारे आहेत. तबरेज शेख (19), दानिश खान (19), अजय दबडे (20,) निजान शेख (20) आणि एका 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. कल्याण रेल्वे कोर्टात या चार जणांना हजर केले असता चारही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी केला आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली. चालत्या मेल एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाला लूटण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या:

Nagpur Crime | प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

Amravati Crime | पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ

Pune crime |आधी गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावले अन… ; पुणे पोलिसांनी उघड केले धक्कादायक वास्तव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.