AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फाशी…फाशी…’; सरकारचे ‘संकटमोचक’ बदलापूर रेल्वे स्थानकावर येताच शेकडो आंदोलकांकडून घोषणाबाजी

घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं? असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं गिरीश महाजन म्हणाले.

'फाशी...फाशी...'; सरकारचे 'संकटमोचक' बदलापूर रेल्वे स्थानकावर येताच शेकडो आंदोलकांकडून घोषणाबाजी
सरकारचे 'संकटमोचक' बदलापूर रेल्वे स्थानकावर, शेकडो आंदोलकांकडून 'फाशी...फाशी'ची घोषणा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 20, 2024 | 4:10 PM
Share

बदलापुरात मन हेलावणारी घटना घडली आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या विरोधात बदलापूरकरांनी संपूर्ण रेल्वे स्थानक जाम केलं आहे. बदलापूरच्या नागरिकांनी गेल्या आठ तासांपासून रेल्वे सेवा ठप्प केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अखेर आंदोलकांचा आक्रोश पाहता भाजपचे संकटमोचक नेते अशी ख्याती असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून नागरिकांच्या मनधरणीचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

गिरीश महाजन आंदोलकांशी बोलू लागले यावेळी आंदोलकांनी ‘फाशी…फाशी…’ अशा घोषणाबाजी सुरु केली. यावेळी गिरीश महाजन यांनी नागरिकांना असा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न केला. आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. आरोपीवर कायदेशीर मार्गाने कारवाई होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं.

आंदोलकांचा गिरीश महाजन यांना सवाल

“घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं?”, असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.

“ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे, ज्यांनी वेळकाढूपणा केला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांना सोडलं जाणार नाही. पोलिसांना सस्पेंड करता येईल. तात्काळ आरोपीला फाशी देता येत नाही. असा कायदा नाही. तुमचा राग मान्य आहे. तुमचा संताप मान्य आहे. योग्य आहे. पण आरोपीला थेट फाशी देता येत नाही. दोषी पोलिसांना आजच्या आज सस्पेंड केलं जाईल. आताच्या आता कारवाई करू. ज्यांनी केस घ्यायला उशीर केला, त्यांना सस्पेंड करू”, असं गिरीश महाजन यांनी आंदोलकांना वचन दिलं.

‘अनेक डॉक्टर, पेशंट आणि विद्यार्थी…’, महाजनांची कळकळीची विनंती

“तुमच्या मनात जेवढा राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही लाईफ लाईन आहे. अनेक डॉक्टर, पेशंट आणि विद्यार्थी ये जा करत असतात. एवढावेळ ट्रेन थांबवता येणार नाही. त्यामुळे लोकल सुरू करा”, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.

आतापर्यंत 4 मोठ्या कारवाया, गिरीश महाजनांची माहिती

  • शाळेतील मुख्याध्यापकाला सस्पेंड केलं
  • शिक्षकांना निलंबित केलं
  • पीआयला निलंबित केलं
  • मुख्य आरोपी अटकेत

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन