कल्याणमध्ये अज्ञात कारणावरून रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा केला.

कल्याणमध्ये अज्ञात कारणावरून रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
कल्याणमध्ये अज्ञात कारणावरून रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 1:06 AM

कल्याण : अज्ञात कारणावरुन अज्ञात व्यक्तींकडून एका रिक्षा चालकाची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कल्याणमध्ये शनिवारी पहाटे घडली आहे. अभिमान भंडारी असे हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शौचाला गेले असता रिक्षा चालकावर हल्ला

अभिमान भंडारी हे कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील रहिवासी आहेत. भंडारी यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे भंडारी हे आज पहाटे 4 च्या सुमारास गावातील सार्वजनिक शौचालयात शौच करण्यासाठी गेले होते. यावेळी शौचालयात आधीच दबा धरुन बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. भंडारी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा केला. तसेच अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. दरम्यान ही हत्या आर्थिक, कौटुंबिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाली याचा पोलीस सखोल तपास करीत आहेत. (In Kalyan, a rickshaw puller was stabbed to death for an unknown reason)

इतर बातम्या

पूजा कावळे हत्याकांड: पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.