AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा कावळे हत्याकांड: पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाशिम जिल्ह्यातील वाई गौळ येथील पूजा कावळे हिचा सेवानिवृत्त सैनिक अनिल कावळे याच्यासोबत सन 2013 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षांनी पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद वाढत गेले.

पूजा कावळे हत्याकांड: पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 10:39 PM
Share

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शेत शिवारात पुजा कावळे या विवाहितेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यानंतर पुजाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. या घटनेमूळे जिल्हात एकच खळबळ उडाली होती. अखेर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले असून पुजाच्या हत्येचा मास्टरमाईंड तिचा पतीच असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांना ताब्यात घेतले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.

पती-पत्नीमध्ये घरगुती वाद होते

वाशिम जिल्ह्यातील वाई गौळ येथील पूजा कावळे हिचा सेवानिवृत्त सैनिक अनिल कावळे याच्यासोबत सन 2013 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षांनी पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद वाढत गेले. हा वाद विकोपाला गेल्याने पत्नी पूजा कावळे हिने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर प्रकरण घटस्फोटकरीता न्यायालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून पूजा ही माहेरीच राहत होती. अशात 10 नोव्हेंबरपासून घरातून पुण्याला जाण्यासाठी पूजा निघाली होती. मात्र ती पुण्यात पोहचली नसल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात नोंदवली. त्यानंतर 16 नोव्हेंबरला पूजा कावळे हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. ते चिरकुटा मार्गे असलेल्या चव्हाण यांच्या शेतातील कापूस व तुरीच्या ओळीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

72 तासांनी पूजा कावळे हत्या प्रकरणाचा उलगडा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यात पुजाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र हत्या कुणी केली, हे कळायला मार्ग नव्हता. दरम्यान या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात दिग्रस पोलीस, एलसीबी, सायबर सेल अशी वेगवेळगी चार पथक तयार करण्यात आली. या पथकाने मारेकऱ्याची शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर अखेर 72 तासांनी पोलीस पथकाला पूजा कावळे हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले.

पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड

विशेष म्हणजे पूजा हिचा पती अनिल कावळे हाच या हत्या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी अनिल कावळे, उज्वल नगराळे, गौरव राऊत आणि अभिषेक म्हात्रे यांना अटक केली आहे. तर आणखी मारेकरी अद्याप फरार आहे. ही कारवाई पार पाडणाऱ्या तपास पथकाला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भुजबळ यांनी 25 हजार रूपये प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. (Pooja Kavale murder, mastermind of husband’s death, three arrested by police)

इतर बातम्या

चालत्या ट्रेनमधून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

तिप्पट पैसे करतो म्हणत मध्यस्थीच्या मदतीने मांत्रिकाने घातला लाखोंचा गंडा, बीडमध्ये एकाला अटक

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.