AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan: कल्याणमध्ये रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेला अन् ओमिक्रॉनचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

कल्याण डोंबिवली महापालिका लसीकरणासाठी करत असलेल्या सर्व्हेक्षणात 4 जणांचे कुटुंब नायजेरियातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी या चारही जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 3 डिसेंबर रोजी चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

Kalyan: कल्याणमध्ये रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेला अन् ओमिक्रॉनचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
दक्षिण आफ्रिकेतल्या अभ्यासानुसार ओमिक्रॉन ही नैसर्गिक लस असल्याचं सांगण्यात येतंय
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 10:06 PM
Share

कल्याण : नायजेरियामधून 3 डिसेंबर रोजी डोंबिवलीत आलेल्या चार जणांचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू करून पालिका प्रशासनाने त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी लॅबमध्ये पाठवले होते. या दरम्यान या चौघांना केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चौघांची प्रकृती स्थिर होती. या चारही रुग्णांच्या ओमिक्रॉन अहवालाची प्रतीक्षा असतानाच 15 दिवसानंतर या रुग्णाची केलेली आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने आज शुक्रवारी सकाळी या चौघांना डिस्चार्ज देण्यात आला. या चौघाना सात दिवसांचा होम क्वांरटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र संध्याकाळी या चौघांमधील 45 वर्षीय रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली असा अहवाल केडीएमसी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

दरम्यान रुग्णाचा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह अहवाल व डिस्चार्ज एकाच दिवशी आला आहे. अहवालासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ओमिक्रॉन रोखणार तरी कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एकाच कुटुंबातील चौघे जण असून ते नायजेरियातून आले होते

कल्याण डोंबिवली महापालिका लसीकरणासाठी करत असलेल्या सर्व्हेक्षणात 4 जणांचे कुटुंब नायजेरियातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी या चारही जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 3 डिसेंबर रोजी चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. चौघांपैकी  एक दहा वर्षाचा मुलगा व एक 6 वर्षाची मुलगी आहे. या कुटुंबापैकी पती-पत्नी दोघांचेही कोविड लसीकरणाचे दोन्ही डोसेस झालेले आहेत. या चौघांचे नमुने 4 डिसेंबर रोजी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल प्रलंबित होता तर अहवालाच्या प्रतीक्षेत 15 दिवस या सर्व रुग्णांना पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये निगराणी खाली ठेवण्यात आले होते.

15 दिवसानंतर आरटीपीआर निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज

15 दिवसानंतर नियमानुसार या सर्व रुग्णांची पुन्हा आरटी पीसीआर तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दुपारी घरी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण उपचारानंतर घरी परतल्यानंतर संध्याकाळी या रुग्णाचा अहवाल तब्बल 15 व्या दिवशी प्राप्त झाला. आज त्यापैकी 45 वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल ओमिक्रॉन पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान सदर कुटुंबातील चारही व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल, विलगीकरण कक्षातील उपचाराअंती निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज दुपारी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. सदर कुटुंबाचे 24 हाय रिस्क व 62 लो रिस्क काँटॅक्ट अशा 86 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता त्यातील 4 निकट सहवासीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले असून त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (In Kalyan, after the patient was cured and went home, the report of Omicron came positive)

इतर बातम्या

3 महिन्यात 20 हजार बांधकामे कसे पाडणार? निवडणुकीचा टार्गेट तर पूर्ण करायचा नाही ना?; आमदार राजू पाटलांचा सवाल

निधीबाबतचा पुरावा द्या, नाही तर गुन्हा दाखल करू; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.