मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडेंना अटक होणार

सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. (Dhananjay gawade will be arrested)

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडेंना अटक होणार
धनंजय गावडे
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 3:31 PM

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ नालासोपऱ्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या 15 दिवसात धनंजय गावडेने पोलिसांसमोर हजर व्हावं, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे गावडेला लवकरच अटक केली जाईल, असे बोललं जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. (Mansukh Hiren Death case Dhananjay gawade will be arrested)

नालासोपऱ्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खंडणीसह अनेक गुन्हे असलेला आणि सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

बेकायदा बांधकामांना लक्ष्य करून धनंजय गावडेने वसई-विरार भागातील बिल्डरमध्ये दहशत निर्माण केली होती. धनंजय गावडेच्या विरोधात ठाण्यात खंडणी, बलात्कार, फसवणूक असे 8 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी जामीन मिळावी, यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गावडेवर असलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत उच्च न्यायलयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय गावडे याला जबरदस्त दणका बसला आहे. येत्या 15 दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे बोललं जात आहे.

कोण आहेत गावडे?

धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक होते. गावडे हे 45 वर्षीय आहेत. ते पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. गावडे हे 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ६३ मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

फसवणूक, खंडणी, बलात्काराचा आरोप

धनंजय गावडे हे नालासोपाऱ्यातील वादग्रस्त माजी नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर फसवणूक, खंडणी मागणे आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्यावर 2018मध्ये एका 34 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही बिल्डरांनी त्यांच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच 2016मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. ही रक्कम ईडीला गावडे यांच्या गाडीत मिळाली होती.

एकूण 9 एफआयआर

धनंजय यांच्यावर एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यात बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या एफआयआर 2015 ते 2018 दरम्यान दाखल करण्यात आल्या. धनंजय याने बिल्डरांना धमकी दिली की बांधलेल्या इमारती महापालिकेच्या प्लानिंगनुसार नाहीत. त्या तोडल्या जाऊ शकतात. महितीच्या अधिकाराखाली त्यांने ही माहिती काढल्याचं त्याने सांगितलं. आणि पैशांची मागणी केली. 500 हुन अधिक प्रकरणाची धनंजय आणि त्याच्या साथीदाराने माहिती मागवली, आणि त्याच माहितीच्या आधारे लोकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला. 2015 साली धनंजय गावडे वसई-विरार मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले. गावडेंवर वसई, नालासोपारा, तुलिंज, वालीव, विरार पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी 10 च्यावर गुन्हे दाखल आहेत. (Mansukh Hiren Death case Dhananjay gawade will be arrested)

संबंधित बातम्या : 

Mansukh Hiren death: धनंजय गावडेंना शेवटचे भेटले, 40 किमीवर बॉडी मिळाली, फडणवीसांनी उल्लेख केलेले धनंजय गावडे कोण?

मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीसांनी 12 दिवसात 10 गुन्हे ठोकले, मला आयुष्यातून का उठवताय? : धनंजय गावडे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.