कोरोना काळात एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, महाराष्ट्रदिनी ‘ऑक्सिजन बँके’चा शुभारंभ, ठाण्यात ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन

राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोरोना काळात रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण उपायोजना करत आहेत. (Eknath Shinde work for corona patients in Pandemic)

कोरोना काळात एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, महाराष्ट्रदिनी 'ऑक्सिजन बँके'चा शुभारंभ, ठाण्यात ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन
कोरोना काळात एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 10:02 PM

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोरोना काळात रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण उपायोजना करत आहेत. त्यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम या कामात दिवसरात्र मेहनत करत आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen Shortage) जाणवत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना (Oxygen Bank Scheme) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले (Eknath Shinde work for corona patients in Pandemic).

ऑक्सिजन बँकेत सध्या 120 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

एमएमआर रिजनमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे अवघड आहे. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी शिंदे यांनी या ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेच्या 120 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने दहा लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

ठाण्यातील अनेक शहरातील गरजूंना मदत होणार

या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्सद्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष याच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णापर्यंत पोहचवण्यात येणार आहे (Eknath Shinde work for corona patients in Pandemic).

कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण दररोज ऐकत आहोत. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सूरु केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ऑक्सिजन बॅंकेच्या या लोकार्पण सोहळ्याला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मितीकडे ठाणे महापालिकेची वाटचाल

ठाणे शहरात ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने स्वयंपूर्ण ऑक्सिजन निर्मितीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्पांचा शुभारंभ शनिवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रतिदिन 3.2 टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प आजपासून कार्यान्वित करण्यात आले असून लवकर 650 ऑक्सिजन बेडना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे.

हेही वाचा : धोका वाढला! राज्यात आज 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 802 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.