दाराला कडी लावण्याच्या वादातून शेजाऱ्यावर चाकूहल्ला, आरोपीला अटक आणि जामीन

तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियांका चारी, स्नेहा नारगोलकर आणि विनोद नारगोलकर या तिघांच्या विरोधात आयपीसी 324, 352, 323 आणि 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही अटक करण्यात आली.

दाराला कडी लावण्याच्या वादातून शेजाऱ्यावर चाकूहल्ला, आरोपीला अटक आणि जामीन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 6:32 PM

अंबरनाथ : दरवाजाला बाहेरून कडी लावण्यावरून झालेल्या वाद होऊन शेजाऱ्याने शेजाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर शेजाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या पाठारे पार्क परिसरातील गुलमोहर चौकात साईप्रसाद नावाची इमारत आहे. या इमारतीत जीवन लोखंडे हे त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्याला आहेत. (Neighbor stabbed in trivial dispute, accused arrested and granted bail)

कडी कुणी लावली विचारल्याने चाकूहल्ला

जीवन यांच्या दरवाजाला वारंवार कुणीतरी बाहेरून कडी लावून ठेवतो. त्यामुळे जीवन आणि त्यांच्या परिवाराला त्रास सहन करावा लागतो. 8 ऑक्टोबर रोजी अशाच पद्धतीने जीवन यांच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्याने त्यांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली. यामुळे शेजारी राहणारे स्नेहा नारगोलकर आणि त्यांची आई प्रियांका या दोघींनी जीवन यांच्या पत्नीला शिवीगाळ केली होती. त्यावेळी जीवन यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 18 ऑक्टोबर रोजी जीवन हे रात्री कामावरून घरी आले असता त्यांना आपल्या दाराला बाहेरून कडी लावलेली असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली असता शेजारी राहणारे विनोद नारगोलकर, स्नेहा नारगोलकर आणि स्नेहा यांची आई प्रियांका यांनी घराबाहेर येऊन जीवन यांच्याशी भांडायला सुरुवात केली. त्यातच विनोद नारगोलकर यांनी जीवन लोखंडे यांच्या जांघेवर चाकूने वार केला. तर प्रियांका आणि स्नेहा यांचीही त्यांच्याशी झटापटी झाली.

आरोपीला अटक आणि सुटका

या घटनेनंतर जीवन लोखंडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियांका चारी, स्नेहा नारगोलकर आणि विनोद नारगोलकर या तिघांच्या विरोधात आयपीसी 324, 352, 323 आणि 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं असता न्यायालयानं जामिनावर सुटका केली.

नाशिकमध्ये पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला

किरकोळ कारणातून भर रस्त्यात एकाचा चाकूने भोसकून खून झाल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरच हा खून झाल्याने नाशकात गुन्हेगार किती बेभान झाले आहेत, हे दिसून येत आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील दूध बाजारात दोघात किरकोळ करणातून वाद झाला आणि एकाने त्याच्याजवळील धारदार हत्यार दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. संशयित आरोपी आणि मयत हे दोघेही फिरस्ते असल्याची माहिती आहे. (Neighbor stabbed in trivial dispute, accused arrested and granted bail)

इतर बातम्या

अकरा संसाराची राखरांगोळी करणारा संजय पाटील दारुडा आणि माथेफिरू; पती-पत्नीच्या भांडणाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू

दारुडा बसमध्ये करीत होता छेडछाड, भर रस्त्यात महिलेने अशी घडवली अद्दल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.