अकरा संसाराची राखरांगोळी करणारा संजय पाटील दारुडा आणि माथेफिरू; पती-पत्नीच्या भांडणाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू

पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने घरातील गादी पेटवून दिली व स्वतःच्या घराला आग लावली.

अकरा संसाराची राखरांगोळी करणारा संजय पाटील दारुडा आणि माथेफिरू; पती-पत्नीच्या भांडणाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू
अकरा संसाराची राखरांगोळी करणारा संजय पाटील दारुडा आणि माथेफिरू


सातारा : पती पत्नीच्या भांडणातून एका दारुड्या माथेफिरु पतीने घराला आग लावून अकरा संसाराची राखरांगोळी केल्याची घटना पाटण तालुक्यातील माजलगाव गावात घडली आहे. आगीत स्वतःच्या घरासोबत अख्खा पाटील वाडा जळून खाक झाला असून वाड्यातील अकरा कुटुंबं रस्तावर आली आहेत. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे. नवरा बायकोतील भांडणाच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. (In Satara, a house was set on fire in a quarrel between husband and wife)

आगीत 50 लाखांहून अधिक नुकसान

पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने घरातील गादी पेटवून दिली व स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर या आगीने रुद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला आणि ही सर्व घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयाचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. जाळपोळ करणाऱ्या पतीला मात्र ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला.

धनधान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

या आगीत पाटील वाडा जळून खाक झाला असून धनधान्यासह संसार उपयोगी साहित्य जळून गेले आहे. या वाड्यातील अकरा कुटुंब रस्त्यावर आली आहेत. आग लावणारा संबधित संजय पाटील हा दारुडा व माथेफेरु असल्याची माहिती आगीत घर जळालेल्या मनोहर पाटील यांनी दिली. व्यसनी माथेफिरुमुळे अकरा कुटुंब रस्त्यावर आली असुन त्यांना जगण्यासाठी शासन मदतीची गरज आहे

या नवरा-बायकोच्या भांडणात मात्र इतरांच्या संसाराची राखरांगोळी झाली. घर पेटवणाऱ्या संजय पाटील यांच्या शेजारी असणाऱ्या उमेश पाटील यांच्या घरात पाच लोक असून रात्रीच्या आगीत घराची राखरांगोळी झाली आहे. नुकतेच काढणी केलेले सोयाबिन, भुईमुग अशा धान्यांची राख झाली आहे. घरातील संसारिक साहित्यासह रोख रक्कम व चौदा तोळे सोने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. हे सांगताना उषा पाटील या माऊलीचा हुंदका दाटून आला. अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या या परिवारासमोर अंधार दाटून आला आहे. एका चुकीने 50 लोकांना रस्त्यावर आणलेल्या या नवरा बायकोच्या घरगुती भांडणातून किती मोठा अनर्थ होऊ शकतो याचे माजगाव पाटणची घटना मोठे उदाहरण आहे. (In Satara, a house was set on fire in a quarrel between husband and wife)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI