घणसोलीतील सिडकोच्या घरांच्या चाव्या चोरट्यांच्या हाती, रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सिडकोने अनेक घरांचा ताबा रहिवाशांना दिला असला तरी बहुतांश घरांच्या डुप्लिकेट चाव्या अजूनही विकासक शिर्के कंपनीच्या अभियंत्यांजवळ आहेत. त्यामुळे चोर डुप्लिकेट चाव्यांवरही डल्ला मारून रहिवाशी राहत असलेल्या घरांत शिरकाव करू शकतात, अशी भिती निर्माण झाली आहे.

घणसोलीतील सिडकोच्या घरांच्या चाव्या चोरट्यांच्या हाती, रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घणसोलीतील सिडकोच्या घरांच्या चाव्या चोरट्यांच्या हाती
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 4:36 PM

नवी मुंबई : घणसोली येथील सिडको योजनेतील मेघमल्हार गृहसंकुलात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या इमारतींमध्ये चोऱ्या घडत आहेत. चोरीचे सत्र सुरू असतानाच चोरट्याने चक्क सिडकोच्या ताब्यातील घरांच्या चाव्याही मिळवल्या आणि बंद घरातील ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. हा धक्कादायक प्रकार दक्ष नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी चोरट्याला शिताफीने पकडले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. (CIDCO house keys in Ghansoli in the hands of thieves)

15 इमारतींसाठी केवळ 3 सुरक्षा रक्षक तैनात

सिडकोच्या घणसोलीतील भूखंडावर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सोडतीतील घरांचा ताबा नुकताच देण्यात आला आहे. रहिवाशी टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा घेत येथे राहण्यास येऊ लागले आहेत. परंतु बरेचसे फ्लॅट अजूनही खाली आहेत. तेथे अजून लोक राहायला आलेले नाहीत. नेमक्याच याच परिस्थितीचा चोरट्यांनी गैरफायदा घेत चोरींचा धुमाकूळ घातला आहे. सिडकोने नव्या घरांचा ताबा देताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे असताना एकूण 15 इमारतींसाठी केवळ 3 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच विकासक शिर्के कंपनीकडून अजून छोटीछोटी कामे बाकी आहेत. त्यामुळे गृहसंकुलात मजूरांचा वावर असून चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे नेमके मजूर कोण हेच रहिवाशांना कळेनासे झाले आहे.

रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण

चोरटे मजूर असल्याचा दिखावा करून इमारतींमध्ये बिनधास्त वावरू लागले आहेत. इमारतीतील रहिवाशी अजून एकमेकांना ओळखत नाहीत. ही परिस्थितीही चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एल 07 क्रमांकाच्या इमारतीमध्ये चोरटा चोरी करताना सापडला. त्याच्याकडे अनेक फ्लॅट्सच्या चाव्यांचा बंच सापडला. तो याच चाव्यांच्या सहाय्याने आणखी घरे फोडण्याचा प्रयत्न करणार होता. सिडकोने अनेक घरांचा ताबा रहिवाशांना दिला असला तरी बहुतांश घरांच्या डुप्लिकेट चाव्या अजूनही विकासक शिर्के कंपनीच्या अभियंत्यांजवळ आहेत. त्यामुळे चोर डुप्लिकेट चाव्यांवरही डल्ला मारून रहिवाशी राहत असलेल्या घरांत शिरकाव करू शकतात, अशी भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत विकासक शिर्के कंपनीचे अधिकारी राजशेखर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन कॉल व मेसेजला उत्तर दिले नाही. (CIDCO house keys in Ghansoli in the hands of thieves)

इतर बातम्या

500 रुपयांच्या उधारीवरुन वादावादी, वर्ध्यात चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.