पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘मी चहावाला’, त्यांचे भाऊ प्रल्हाद म्हणाले, ‘ते चहावाले नाहीतच!’

नरेंद्र मोदी चहावाला नव्हते तर आमचे वडील चहावाले होते, तुम्ही म्हणायचं असेल तर त्यांना चहावाला म्हणा आणि आम्हाला चहावाल्याचे बेटे म्हणा, असं मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी म्हणतात, 'मी चहावाला', त्यांचे भाऊ प्रल्हाद म्हणाले, 'ते चहावाले नाहीतच!'
प्रल्हाद मोदी आणि नरेंद्र मोदी

ठाणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचा उल्लेख करतात. पण मोदींचे सख्खे भाऊ प्रल्हाद मोदी (Pralhad Modi) यांनी मात्र नरेंद्र मोदी चहावाला नव्हते तर आमचे वडील चहावाले होते, तुम्ही म्हणायचं असेल तर त्यांना चहावाला म्हणा आणि आम्हाला चहावाल्याचे बेटे म्हणा, असं म्हटलं. (Pm Narendra Modi is not a Chahawala but our father is a Chahawala Says Modi Brother pralhad Modi)

चहावाले आम्ही नाही तर आमचे वडील

प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.

ज्याचा मुकुट मोठा पत्रकार त्यालाच चालवतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा, असं म्हणत खुद्द नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटे काढले. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात, अशी फटकेबाजी प्रल्हाद मोदी यांनी केली..

प्रल्हाद मोदी यांचा चिमटा नेमका कुणाला?

आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. त्यामुळे प्रल्हाद मोदींनी चिमटा नेमका पत्रकारांना घेतला, की स्वतःला ‘चहावाला’ म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनाच घेतला? अशी कुजबुज सभागृहात रंगली होती.

(Pm Narendra Modi is not a Chahawala but our father is a Chahawala Says Modi Brother pralhad Modi)

हे ही वाचा :

राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

Ganpatrao Deshmukh : राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI