घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?

एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 10:09 PM

कल्याण : कल्याण पूर्वेच्या मलंगगड रोड मार्गावर राधाकृष्ण पार्क पासून आडीवली, नांदिवली, अनमोल गार्डन, द्वारलीपर्यंतच्या अनेक भागांमध्ये गेल्या साडेपाच तासांपासून लाईट गेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या परिसरांमध्ये सकाळपासून लाईट ये-जा करत होती. पण संध्याकाळी चार वाजेपासून जी लाईट गेलीय ती अद्यापही परत आलेली नाही. त्यामुळे नागरीक उकाड्याने भयंकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे लाईट पुढचे आणखी तीन तास येणार नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. तसेच आम्ही महावितरणाचे पीआरओ अधिकाऱ्यांकडे फोनवर माहिती मिळवली असता त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे.

कल्याण पूर्वेत मलंगगड रोडवर शंभर फुटी रोडजवळ विजेचा खांब कोसळला आहे. या भागात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या नाल्याजवळ विजेचा खांब कोसळला आहे. त्यामुळे तिथून आजूबाजूच्या लांबच्या परिसरात विजेचा खोळंबा झालाय. अनेक परिसरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घरात गरमी, बाहेर पाऊस आणि प्रचंड काळोख

कल्याण पूर्वेतील वातावरण दुपारपासून खराब आहे. या परिसरात अधूनमधून पाऊस पडतोय आणि घराबाहेर प्रचंड काळोख आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर सोडून बाहेर जाणं देखील डोकेदुखी आहे. कल्याण शहरात दाटीवाटीची वस्ती आहे. इथे लाखो नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे लोकसंख्येची घनता साहजिकच जास्त आहे. पण अशा परिसरात नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरतंय हा खरंच चिंतेचा विषय ठरला आहे.

पावसाचं वातावरण असल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं हे वास्तव आहे. अनेक लाईटमन हे अहोरात्र झटत असतात. हे अतिशय खरं आहे. पण तरीही तब्बल पाच ते सात तास विजेचा खोळंबा होणं अपेक्षित नाही, अशी भावना नागरिकांची आहे. एका मेट्रो सिटीत अशी घटना घडणं हे दुर्देवीच आहे. अनेकांना याचा फटका बसू शकतो.

लाईट कधी येणार?

दरम्यान, महावितरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरांमध्ये रात्री अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत लाईट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुढचे आणखी दोन तास उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विजेचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण कधी होईल, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.